उरण : जेएनपीए बंदराजवळील एका कंटेनर फ्रेट स्टेशनवर महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) मोठी कारवाई करत आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे ३०० कोटी रुपये मूल्य असलेले ५५ किलो मेथाम्फेटामाइन जप्त केले.
गुप्त माहितीच्या आधारे डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी जेएनपीएतील कंटेनरची कसून तपासणी केली. यावेळी मक्याच्या एका गोणीत संशयास्पद पदार्थ आढळून आला. मोबाईल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या पथकाने केलेल्या तपासणीत तो उच्च दर्जाचा मेथाम्फेटामाइन असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
Ulhasnagar : पहाटेच्या अंधारात 'ड्रग्ज डील'चा पर्दाफाश; रामकृष्ण कॉलनीत लाखोंच्या एमडी ड्रग्जसह दोघांना अटकया तस्करीचा संबंध पाकिस्तानस्थित अमली पदार्थ तस्कर महंमद हुसेन दाद याच्या सिंडिकेटशी असल्याचे समोर आले आहे. या टोळीने उत्तर प्रदेशातील व्यापारी संस्थेच्या माध्यमातून मक्याच्या निर्यातीच्या आडून अमली पदार्थांची तस्करी केल्याचा संशय आहे. आंतरराष्ट्रीय रॅकेटचा शोध घेण्यासाठी डीआरआयचा पुढील तपास सुरू आहे.
(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

