Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
विविधता हेच भारताचे सौंदर्य - मोहन भागवत

विविधता हेच भारताचे सौंदर्य - मोहन भागवत

टोरंटो : 'कठीण काळात इतरांना मदत करणे ही भारताची जुनी परंपरा आहे. जगात कुठेही संकट आले आणि भारताकडे मदत मागितली गेली, तेव्हा भारताने कधीही हात झटकून नकार दिला नाही. अनेक वेळा भारताने न मागताही इतरांना मदत केली आहे', असे रोखठोक मत सरसंघचालक मोहन भागवत सोमवारी टोरंटो येथे 'हिंदू विश्व बंधु' कार्यक्रमात व्यक्त केले.

'भारतात विविधता हे एकतेच्या विरोधात नाही, तर ते तिचे सौंदर्य आहे. देशात वेगवेगळ्या जाती, पंथ, भाषा आणि संस्कृती आहेत, पण त्या सर्व एकाच समाजाचा भाग आहेत'. ही विविधता स्वीकारण्याचे आणि तिचा सन्मान करण्याचे आवाहनही भागवत यांनी केले.

'हे माझे, ते तुझे', अशा विचारांमधून बाहेर येण्याची गरज आहे. वेगवेगळी रूपे आणि ओळख असूनही सर्वांमध्ये एकच दिव्यता आहे. म्हणून इतरांना वेगळे किंवा परके मानण्याऐवजी सर्वांशी बंधुत्वाची आणि सेवेची भावना ठेवली पाहिजे', असे ठोस मत त्यांनी व्यक्त केले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Navshakti