Dailyhunt
8 महिन्यांची गर्भवती झाली TVK ची आमदार,प्रचार करताना झाली होती बेशुद्ध,वाचा पल्लवीची थक्क करणारी Success Story

8 महिन्यांची गर्भवती झाली TVK ची आमदार,प्रचार करताना झाली होती बेशुद्ध,वाचा पल्लवीची थक्क करणारी Success Story

TVK Mla MR Pallavi Success Story : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत अभिनेता थलपती विजयच्या टीव्हीके पक्षाने इतिहास रचला आहे. तामिळनाडूच्या 234 जागांपैकी 108 जागा विजयच्या पक्षाने जिंकल्या आहेत.

विजयने अनेक लो प्रोफाईल लोकांना तिकीट वाटले होते. एक तिकीट तर त्याने त्याच्या ड्रायव्हरच्या मुलालाच दिला होता. अशातच टीव्हीकेचा आणखी एका महिला उमेदवाराची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. एमआर पल्लवी असं या महिला उमेदवाराचं नाव आहे. जिने थिरू वी च्या नगर सीटवर विजय संपादन केलं आहे.

एम आर पल्लवी जेव्हा निवडणुकीचा प्रचार करत होती. तेव्हा ती गर्भवती होती. आठ महिन्यांच्या गर्भवती पल्लवीने थिरू वी नगरच्या जागेवर डीएमके नेता केएस रविचंद्रनला 22,333 मतांनी पराभूत केलं आहे. पल्लवीने 12 वी पर्यंत शिक्षण घेतलं आहे. अभिनेता आणि नंतर नेता बनलेल्या विजयच्या तमिळगा वेट्री कळघम (TVK) ने पल्लवीवर विश्वास ठेऊन तिला तिकीट दिलं.पल्लवीनेही पक्षाचा विश्वास सार्थ ठरवला.निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी घरा घरात जाऊन मतं मागितली. स्थानिक लोकांच्या माहितीनुसार, प्रचारादरम्यान ती बेशुद्ध झाली.पण ठीक झाल्यानंतर तिने प्रचार सुरु ठेवला.

>> Kalyan News: पाण्याचा थेंबही वाया घालवू नका, कल्याण-डोंबिवलीत पाणी कपातीचं भीषण संकट, तारीख अन् वेळ वाचा

108 जागा जिंकून TVK बनला सर्वात मोठा पक्ष

विजयी झाल्यानंतर पल्लवीने मीडियासोबत संवाद साधला नाही. कारण डॉक्टरांनी तिला आराम करण्याचा सल्ला दिला आहे. पल्लवीचे पती राजेशने सांगितलं की,डॉक्टरांनी तिच्याकडून (पल्लवी) 20 मे च्या आसपास रुग्णालयात भरती होण्यासाठी सांगितलं. पल्लवी आणि राजेश त्यांच्या दुसऱ्या अपत्याच्या स्वागताच्या तयारीला लागले आहेत. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचा निकाल 4 मे रोजी घोषित केला गेला.

>> Sangli News: सांगलीच्या 'या' गावात घडतात अघटित घटना..एक थेंबही दूध विकलं जात नाही, कारण वाचून हादरूनच जाल

राज्यात पहिल्यांदा निवडणूक लढवणाऱ्या टीव्हीकेनं 108 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष बनण्याचा मान मिळवला. तत्कालिन मुख्यमंत्री एमके स्टालिनच्या नेतृत्वातील डीएमकेनं 59 जागा,तर विरोधी पक्ष ऑल इंडिया अन्ना द्रविड मुनेत्र कझगम (अन्ना द्रमुक) 47 जागांवर विजय मिळाला. राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे की, पल्लवी सारख्या उमेदवारांचा विजय तामिळनाडूच्या राजकीय पटलावर बदल घडवून आणू शकतो.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NDTV Marathi