Dailyhunt
AC Water Benefits: तुम्हीही फेकून देता AC मधून बाहेर पडणारं पाणी? पैसै अन् मेहनतही वाचेल, फक्त 'असा' करा वापर

AC Water Benefits: तुम्हीही फेकून देता AC मधून बाहेर पडणारं पाणी? पैसै अन् मेहनतही वाचेल, फक्त 'असा' करा वापर

How To Use AC Water: गरमी आणि उष्णतेपासून वाचण्यासाठी अनेक लोकांच्या घरात एअर कंडीशनर (AC) तासनतास सुरु असतं. जेव्हा एसी चालू राहतं, तेव्हा तुमच्या लक्षात आलं असेल की, मागे लावलेल्या पाईपमधून पाणी पडतं.

अनेक लोक या पाण्याला वेस्टेज समजून बाहेर फेकून देतात. पण तुम्ही कधी विचार केलाय? एका रात्रीत तुमचा एसी किती पाणी बाहेर फेकतं? दमट वातावरणात एक एसी एका रात्रीत अनेक लीटर पाणी बाहेर काढतो. या पाण्याला फेकणं म्हणजे वस्तु खराब करणं..जर तुम्हालाही हे पाणी बाहेर फेकायचं नसेल,तर याचा वापर तुम्ही कामांमध्ये करू शकता.

हे पाणी कुठून येतं?

एसी जेव्हा रुममधील गरम हवा सकवतो,तेव्हा त्या हवेत असलेला दमटपणा (Humidity) थंड होऊन पाण्याच्या थेंबात बदलतो. याला कंडेस्ट वॉटर (Condensed Water) म्हणतात. हे पाणी मोठ्या प्रमाणात डिस्टिल्ड वॉटर सारखं असतं. म्हणजेच याच्यात सामान्य नळाच्या पाण्याप्रमाणे मिनरल्स किंवा फ्लोराईड नसतं.

>> Pune News: पुण्यातील भीमाशंकर परिसरात घडतायत भयंकर घटना, स्थानिकांसह पर्यटकांची धडधड वाढली

या पाण्याचा वापर कुठे आणि कसा कराल?

झाडे

एसीच्या पाण्याचा सर्वात चांगला उपयोत गार्डनिंग मध्ये करू शकता. कारण यामध्ये क्लोरीन नसतं. म्हणून हे झाडाच्या वापरासाठी खूप चांगलं मानलं जातं.जर तुम्ही घरात मनी प्लांट किंवा अशी झाडे लावली आहेत,तर त्यांच्यासाठी हे पाणी बेस्ट आहे. यामध्ये मिनरल्स कमी असतात. जर तुम्ही याला मातीच्या झाडांमध्ये टाकले, तर महिन्यात एकदा खताचा वापर नक्की करा.

घराची साफसफाई

दररोज घराच्या साफसफाईसाठी आपण खूप पाणी फेकून देतो. एसीमधून बाहेर पडणारं पाणी बादलीत भरा आणि त्यामध्ये फिनेल किंवा क्लिन्झर मिसळून ते साफसफाईसाठी वापरा.

>> Buldhana News: खामगाव शहरात खळबळ! पत्नीने घटस्फोटाची मागणी केली, नंतर घडली सर्वात भयंकर घटना, 4 जणांनी..

टॉयलेट फ्लश

एकदा फ्लश चालवल्यावर जवळपास 5 ते 10 लीटर पाणी खर्च होतं. जर तुम्ही एसीच्या पाण्याला स्टोर करून बाथरूममध्ये ठेवलं, तेव्हा फ्लशच्या ऐवजी किंवा लादी धुवण्यासाठी याचा वापर करू शकता. हे पाण्याची बचत करण्याचा सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय आहे.

कारचे वायपर

कारच्या वायपर टँकमध्ये साध्या नळाचं पाणी टाकल्याने पाईपमध्ये कचरा जमा होऊ शकतो किंवा नोजल ब्लॉक होऊ शकतो. एसीचं पाणी डिस्टिल्ड वॉटरसारखं असतं. याला तुम्ही तुमच्या कारच्या वायपरच्या फ्लूईडमध्ये टाकू शकता.याच्यासोबत थोडसं लिक्विड सोप मिसळा आणि तुमच्या कारची काच चकाचक होईल.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NDTV Marathi