Nashik Ashok Kharat Case: नाशिकचा अत्याचारी भोंदुबाबा अशोक खरात प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत आहेत. सध्या पोलीस कोठडीत असलेल्या अशोक खरातची कसून चौकशी सुरु असून याप्रकरणात राजकीय नेत्यांसह, बिल्डर, प्रशासकीय अधिकारीही चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत.
याचबाबत आता मोठी अपडेट समोर आली असून भोंदू अशोक खरात प्रकरणी एक वरिष्ठ महिला अधिकारी रडारवर आली आहे.
अशोक खरात प्रकरणात वरिष्ठ महिला अधिकारी रडारवर
याबाबत सविस्तर वृत्त असे की, भोंदू अशोक खरात प्रकरणी एक वरिष्ठ महिला अधिकारी तपास अधिकाऱ्यांच्या रडारवर आल्याची मोठी अपडेट समोर आली आहे. एसआयटी तपासामध्ये या तत्कालीन महिला अधिकाऱ्याचा संंबंध समोर आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. या महिला अधिकाऱ्याने नाशिकमध्ये पोस्टिंग असताना प्रशासकीय पातळीवर भोंदु अशोक खरातची मदत केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
Ashok Kharat: अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट! बड्या अधिकाऱ्यांसह बिल्डरही अडकणार? 300 कोटींची जमीन अन्...
धक्कादायक बाब म्हणजे, या महिला अधिकाऱ्याने केलेल्या मदतीच्या बदल्यात अशोक खरातने आपलं नेटवर्क वापरुन या महिला अधिकाऱ्याला पसंतीची पोस्टिंग दिल्याचीही चर्चा होत आहे. याप्रकरणात नाशिकची तत्कालीन महिला अधिकारी आणि अशोक खरात यांच्यात आर्थिक व्यवहार झालेत का? असाही सवाल उपस्थित होत आहे. या बाजूनेही एसआयटीचा तपास सुरु असून कोणकोणते खुलासे होणार? कोणते बडे मासे गळाला लागणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
शिर्डीच्या माजी नगराध्यक्षांचीही चौकशी
दरम्यान, अशोक खरातने एसआयटीकडे नोंदवलेल्या जबाबावरुन शिर्डी नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व काही माजी नगरसेवकांनाही चौकशीसाठी हजर राहण्याच्या नोटीस बजावण्यात आल्याचं समोर आले आहे. या प्रकरणात दोन माजी नगराध्यक्षांनी नाशिक येथे एसआयटीसमोर उपस्थित राहून जबाब नोंदवल्याचेही सांगण्यात येत आहे. लोकसत्ता या वृत्तपत्राने यासंबंधीत बातमी दिली आहे.

