Tamil Nadu Kerala Puducherry Assembly election Result LIVE 2026: तामिळनाडूतील सर्व 234 विधानसभा जागांसाठी 23 एप्रिल रोजी झालेल्या निवडणुकीचा निकाल सोमवार, 4 मे रोजी जाहीर केला जाणार आहे.
तामिळनाडूतील मुख्य लढत डीएमके आणि एआयएडीएमके यांच्यात आहे, परंतु अभिनेता विजयने तामिळगा वेटी कळघम (टीव्हीके) मधून निवडणुकीच्या मैदानात उडी घेतल्याने ही लढत अधिकच रंजक बनवली आहे.
पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकीतील सर्व 30 जागांसाठी 9 एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान झाले. आज, 4 मे रोजी मतमोजणी होत आहे. सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला 17 जागांची आवश्यकता आहे.

