Dailyhunt
Baramati- Rahuri Election Result LIVE: सुनेत्रा पवारांची मोठी आघाडी, अक्षय कर्डिलेंचीही मुसंडी, वाचा अपडेट्स

Baramati- Rahuri Election Result LIVE: सुनेत्रा पवारांची मोठी आघाडी, अक्षय कर्डिलेंचीही मुसंडी, वाचा अपडेट्स

Maharashtra Baramati Assembly & Rahuri Assembly Bypoll Election Vote Counting LIVE Updates: महाराष्ट्रातील राहुरी आणि बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर होणाऱ्या बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह 23 उमेदवार रिंगणात आहेत. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. बारामती एमआयडीसी परिसरातील वखार महामंडळाच्या गोदामात ही मोजणी पार पाडणार आहे. सुरुवातीला पोस्टल मतदान मोजलं जाईल आणि त्यानंतर साडेआठ वाजल्यापासून ईव्हीएम मशीनवरील मतदान मोजलं जाईल.

दुसरीकडे भाजप नेते शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राहुरी पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले हे महायुतीचे उमेदवार आहेत. त्यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार गोविंद मोकाटे वंचितचे संतोष चोळके आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे बंडखोर उमेदवार रावसाहेब खेवरे यांच्यात लढत होणार आहे. मतमोजणीची निवडणूक अधिकाऱ्यांनी तयारी केली असून, 27 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे. निकालाचा पहिला कल हा सकाळी नऊ वाजता येऊन, दुपारपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होईल.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NDTV Marathi