Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Beed News: गुन्हा दाखल होण्यास 8 तास, वैद्यकीय तपासणीसाठी 10 तास, अल्पवयीन अत्याचार पीडितेसह कुटुंबाची फरफट

Beed News: गुन्हा दाखल होण्यास 8 तास, वैद्यकीय तपासणीसाठी 10 तास, अल्पवयीन अत्याचार पीडितेसह कुटुंबाची फरफट

आकाश सावंत

Beed Shocking News: आरोग्य विभागाची माणुसकी ओशाळली असचं बोलण्याची वेळ आली आहे. बीडमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इथं एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आले.

हा धक्का मोठा असतानाच पुढे जे काही तिच्या सोबत झालं ते त्या ही पेक्षा भयंकर होतं. त्यामुळे तर माणूसकी मेली आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. अत्याचार झाल्यानंतर पीडितेची तक्रार तातडीने नोंदवून घेण्यात आली नाही असा तिच्या कुटुंबीयांचा आरोप आहे. त्यासाठी तब्बल 8 तास लागले. त्यानंतर वैद्यकीय तपासणी वेळी तर कहर झाला. इथं या मुलीसह तिच्या कुटुंबीयांना 10 तास बसवून ठेवलं होतं. हा बाब समोर आल्यानंतर संताप व्यक्त केला जात आहे.

चुलत मामे भावाने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचर केले. अत्याचार करताना त्याने मुलीचे तोंड रुमालाने बांधले होते. शिवाय हात दोरीने बांधले होते. अत्याचार करून तो तिथून पसार झाला. ही घटना मुलीने कुटुंबीयांना सांगितली. हा प्रकार बीड जिल्ह्यातील केजमध्ये घडला. कुटुंबींयानी तातडीने केज पोलीस स्टेशन गाठले. त्यावेळी रात्रीचे 9 वाजले होते. त्यांनी झालेला प्रकार सांगितला. तक्रार दाखल करण्याची विनंती केली. मात्र प्रत्यक्ष गुन्हा पहाटे पाच वाजता दाखल करण्यात आल्याचं नातेवाईकांनी सांगितलं. म्हणजेच जवळपास 8 तासांनी गुन्हा दाखल करण्यात आला असा आरोप पीडितेच्या कुटुंबीयांनी केला आहे.

- Kalyan News: दुर्गाडी किल्ल्या बाहेर राडा! बकरी ईदची नमाज झाली की नाही? पोलीस बंदोबस्तात काय झालं?

गुन्हा दाखल व्हावा म्हणून पीडिता आणि तिच्या कुटुंबीयांनी संपूर्ण रात्र पोलीस स्टेशनमध्ये जागून काढली. गुन्हा दाखल झाल्यानंतर वैद्यकीय तपासणी करायची होती. त्यासाठी ते उपजिल्हा रुग्णालयात गेले. पण तिथे ही त्यांची फरफट संपली नाही. मेडीकलसाठी सकाळी 11 वाजता पीडिता रुग्णालयात आली होती. त्यावेळी त्यांना महिला स्त्रीरोगतज्ञ उपलब्ध नसल्याचे कारण देण्यात आले. शिवाय बसायला सांगण्यात आले. पण एक तास झाला दोन तास झाले. रात्रीचे 11 वाजले तरी मेडीकल झाले नाही असा आरोपही पीडितेच्या कुटुंबीयांनी केला. तब्बल 10 तास त्यांना रुग्णालयात बसून ठेवण्यात आले होते.

- NEET Paper Leak: 'जसेच्या तसे प्रश्नांचा रट्टा मारून घेतला' स्पेशल बॅचमधील विद्यार्थ्यांच्या दाव्याने खळबळ

बलात्कार पीडीतेला वैद्यकीय तपासणीसाठी जवळपास 10 तास हॉस्पिटल मध्ये ताटकळत ठेवलं होतं. बीडच्या केज उपजिल्हा रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महिला स्त्रीरोगतज्ञ उपलब्ध नसल्याचे कारण सांगून या पीडितेला थांबवून ठेवण्यात आले होते. अगोदरच बलात्काराच्या धक्क्यामध्ये असलेली पीडिता आणि तिचे कुटुंब यांची अक्षरश: फरफट झाली. यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान या संदर्भात वैद्यकीय अधिकाऱ्यांशी विचारणा केले असता, स्त्री रोग तज्ञ उपलब्ध नाही,डॉक्टर वेळेत उपस्थित झाला नाही अशी जुजबी कारणे दिली आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NDTV Marathi