Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Burning Sensation In Feet: पायांची जळजळ आणि सूज येण्याकडे करू नका दुर्लक्ष, असू शकतो या गंभीर आजाराचा संकेत

Burning Sensation In Feet: पायांची जळजळ आणि सूज येण्याकडे करू नका दुर्लक्ष, असू शकतो या गंभीर आजाराचा संकेत

Burning Sensation In Feet: पाय दुखणे, जळजळ होणे किंवा सूज येणे हा केवळ नेहमीचा थकवा नसून, शरीरात वाढलेल्या वात, पित्त आणि कफाचा एक संकेत असू शकतो. सकाळी उठल्यावर टाचा दुखणे, पायात जडपणा जाणवणे किंवा मुंग्या येणे याकडे दुर्लक्ष करू नका.

या समस्यांवर आयुर्वेदामध्ये अत्यंत प्रभावी उपाय सांगितले आहेत. तीळ तेल, खोबरेल तेलाने केलेला मसाज, त्रिफळा काढा आणि सैंधव मिठाचे पाणी यासारख्या घरगुती उपायांनी पायांना त्वरित आराम मिळून रक्ताभिसरण सुधारते आणि आरोग्य उत्तम राहते. याबाबत डॉक्टर रुचा पै यांनी दिलेली माहिती जाणून घेऊया...

पाय दुखतात, जळजळ होते, सूज येते?

हे फक्त थकवा नाही... शरीराची सिग्नल आहे!

सकाळी पाय टाकला की टाचा दुखतात?

कारण : वाढलेला वात (Dryness + stiffness)

  • तीळ तेल + लसूण गरम करून मसाज करावा → वात शांत होतो, कडकपणा (stiffness) कमी होतो
  • दशमूल काढ्याने पाय शेक → दाह (inflammation) कमी होऊन आराम (deep relief) मिळेल
  • रात्रीच्या वेळेस एरंड तेल लावून ठेवा, सांधे (joints) मऊ होण्यास मदत मिळू शकते

पाय सूजतात, जड वाटतं?

कारणः कफ + जल संचय (fluid retention)

  • त्रिफळा काढ्याने पाय धुणे → सूज (swelling) आणि टॉक्सिन्स (toxins) कमी होऊ शकतात.
  • कोमट पाणी + सैंधव मीठ soak (15 मिनिटे) → रक्ताभिसरण प्रक्रिया (circulation improve) सुधारण्यास मदत मिळेल
  • पुनर्नवा + गोक्षुर (consult करून) → सूज आतून कमी होण्यास मदत करू शकते

पायांना जळजळ, उष्णता जाणवते?

कारणः वाढलेला पित्त (body heat)

  • खोबरेल तेल + चंदन लेप → लगेचच थंडावा मिळू शकतो
  • गुलाबपाणी + कापूर हलका लेप → उष्णता (heat+irritation) कमी होण्यास मदत मिळेल
  • ताक / धने पाणी पिणे → शरीरातील पित्त संतुलित होण्यास मदत करू शकतं

(: Jamun Benefits: उन्हाळ्यात मिळणारे 'हे' फळ मानले जाते डायबिटीजचा सर्वात मोठा शत्रू! कसे, कधी आणि किती खावे? वाचा)

पायात मुंग्या, झिणझिण्या येतात?

कारणः वात + nerve weakness
महानारायण तेलाने मसाज → नसा मजबूत (nerves strengthen) होण्यास मदत मिळेल
अश्वगंधा + बाला (consult करून) → nerve nourishment
कांस्य वाटी (Kansa Wand) मसाज - रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारण्यास मदत मिळेल (circulation + energy flow improve)

दररोजची पायांची काळजी

झोपण्यापूर्वी तेल मसाज (पादाभ्यंग) कोणते फायदे मिळतील?
- शांत झोप + वात शमन
- खूप वेळ उभं राहणं टाळा
- दर तासाला पाच मिनिटे बसा
- घरी आल्यावर गरम पाण्याने पाय धुवा
- स्वच्छता + आराम आणि हायड्रेशन मेंटेन ठेवा
- हे उपाय केल्यास कोरडेपणा आणि क्रॅम्प्सच्या समस्या टाळता येतात.

(: Raw Mango Side Effects: कैरीचा गर नाही तर 'हा' 1 चिकट पदार्थ आहे विषारी; अ‍ॅलर्जीचं धक्कादायक कारण समोर)

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NDTV Marathi