Pineapple Health Benefits For Summer: उन्हाळ्याच्या तीव्र झळांमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण वेगाने कमी होते. शिवाय डिहायड्रेशन आणि उष्माघाताचा (Heat Stroke) धोका वाढतो. अशा ऋतूत आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे असते.
उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी 'अननस' हा एक उत्तम आणि नैसर्गिक पर्याय ठरतो. अननसाचा आंबट-गोड स्वाद जिभेला तृप्त करतोच, पण त्यासोबतच ते आरोग्याचा मोठा खजिना आहे. त्यामुळे उन्हाळ्यात अननस आरोग्यासाठी चांगले समजले जाते.
तज्ज्ञांच्या मते, अननसामध्ये तब्बल 85% पाण्याचे प्रमाण असते. त्यामुळे उन्हाळ्यात याचे सेवन केल्याने शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते. यात भरपूर प्रमाणात फायबर आणि कार्बोहायड्रेट्स असतात. जे उन्हाळ्यात शरीरातील ऊर्जेची पातळी टिकवून ठेवण्यास मदत करतात असं ही ते सांगतात. तुम्ही अननस ताजे कापून, कोशिंबीरमध्ये (सलाद) टाकून किंवा त्याचा रस (ज्यूस) करून घेऊ शकता. याचा थेट फायदा तुमच्या शरीराला होवू शकतो. त्यामुळे अनेक जण उन्हाळ्यात अननस खाणे पसंत करतात.
- Raw Mango Side Effects: कैरीचा गर नाही तर 'हा' 1 चिकट पदार्थ आहे विषारी; अॅलर्जीचं धक्कादायक कारण समोर
आयुर्वेद आणि वैद्यकीय शास्त्रानुसार, अननसामध्ये 'ब्रोमेलेन' नावाचे एन्झाइम असते. जे पचनसंस्था मजबूत करते. तसेच, महिलांसाठी अननस अत्यंत गुणकारी मानला गेला आहे. यामध्ये लोहाचे (Iron) प्रमाण चांगले असते. ज्यामुळे मासिक पाळीदरम्यान (Periods) होणारा त्रास, पोटदुखी आणि थकवा कमी होण्यास मदत होते. अननसाचा ज्यूस पिण्यामुळे मासिक पाळीशी संबंधित समस्या दूर होतात.
- Jamun Benefits: उन्हाळ्यात मिळणारे 'हे' फळ मानले जाते डायबिटीजचा सर्वात मोठा शत्रू! कसे, कधी आणि किती खावे?
अननसामध्ये व्हिटॅमिन C, मॅंगनीज आणि अँटी-ऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि दाहकता (सूज) कमी होते. व्हिटॅमिन C मुळे उन्हाळ्यातही त्वचा चमकदार आणि निरोगी राहते. तसेच यातील अँटी-व्हायरल गुणधर्म संसर्गापासून शरीराचे रक्षण करतात. त्यामुळे उन्हाळ्यात अननस खाण्याचे किंवा त्याचे ज्यूस पिण्याचा सल्ला तज्ज्ञ देत असतात.

