Dailyhunt
Crime: छत्रपती संभाजी नगरमध्ये खळबळ! मृदंगाचार्य लाघाने महाराजांच्या अनैतिक संबंधामुळे पत्नीनं जीवन संपवलं

Crime: छत्रपती संभाजी नगरमध्ये खळबळ! मृदंगाचार्य लाघाने महाराजांच्या अनैतिक संबंधामुळे पत्नीनं जीवन संपवलं

मोसिन शेख, प्रतिनिधी

Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगरमध्ये कौटुंबिक छळ,मानसिक त्रास आणि पतीच्या कथित अनैतिक संबंधांमुळे त्रस्त झालेल्या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रांजणगाव शेपू येथे घडली आहे.

याप्रकरणी पतीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसच गुन्हाही दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील देवपिंपळगाव येथील शेतकरी आण्णासाहेब केशवराव जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार,त्यांची मुलगी काजलचे लग्न 25 मार्च 2025 रोजी रांजणगाव शेनपुंजी येथील मृदुंगाचार्य अमोल बाबासाहेब लघाणे याच्याशी पारंपरिक पद्धतीने झाले होतं.अमोल लघाणे हा कीर्तनामध्ये मृदंग वाजवणारा मृदंगाचार्य म्हणून ओळखला जात होता.

अमोलचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध

लग्नानंतर सुरुवातीला काजलचा संसार सुरळीत सुरू होता.परंतु,काही महिन्यांनंतर अमोलचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय निर्माण झाला. या कारणावरून काजलला सतत मानसिक त्रास सहन करावा लागत होता. यासोबतच पतीकडून वारंवार धमक्या,शिवीगाळ आणि मारहाण केली जात असल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.

>> Gautam Adani: गौतम अदाणी यांची कुटुंबासह अयोध्येतील राम मंदिराला भेट, दर्शन घेतल्यानंतर दिली मोठी प्रतिक्रिया

काजलने ही बाब आपल्या आई-वडिलांना सांगितल्यानंतर कुटुंबीयांनी दिवाळीच्या सुमारास अमोलला समजावण्याचा प्रयत्न केला होता.मात्र,त्याने उद्धट वर्तन करत कोणतीही सुधारणा न दाखवता धमक्या दिल्या,अशीही माहिती समोर आली आहे. 1 एप्रिल 2026 रोजी सकाळी 7:20 वाजण्याच्या सुमारास काजलने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.तिच्या सासऱ्यांनी ही माहिती कुटुंबीयांना दिल्यानंतर तिला तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले,मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.या घटनेनंतर कुटुंबीयांनी "पतीच्या सततच्या छळामुळेच काजलने टोकाचा निर्णय घेतला" असा आरोप करत अमोल लघाणे याच्याविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NDTV Marathi