Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
​DMart Bill: डी मार्टच्या बिलावर पेनाने तीन रेषा का मारतात? 99 टक्के लोकांना याची कल्पनाच नाही

​DMart Bill: डी मार्टच्या बिलावर पेनाने तीन रेषा का मारतात? 99 टक्के लोकांना याची कल्पनाच नाही

डी मार्ट हे मध्यमवर्गीयांच्या खरेदीचं आवडतं ठिकाण. एकाच ठिकाणी सर्व गोष्टी हमखास मिळणार याची त्यांना शाश्वती असते. त्यामुळे डी मार्ट ही पहिली पसंती ठरते. डी मार्ट देशातील प्रत्येक छोट्या मोठ्या शहरात आपल्याला दिसून येतं.

त्याचं जाळं ही मोठ्या प्रमाणात पसरलं आहे. डी मार्टमध्ये मिळणाऱ्या आकर्षक ऑफर्स आणि सवलतींमुळे लोक येथे खरेदीसाठी तुफान गर्दी करतात. पण तुम्ही कधी नोटीस केले आहे का? जेव्हा तुम्ही खरेदी करून कॅश काउंटरवरून बाहेर पडता, तेव्हा तेथील कर्मचारी तुमच्या बिलावर पेनाने तीन तिरक्या रेषा मारतात. त्यानंतर त्यावर एक अंक लिहीला जातो. डी मार्टमध्ये जाणाऱ्या जवळपास 99 टक्के लोकांना याचा अर्थच माहित नाही.

​DMart चे काही संकते आणि नियम आहे. हे नियम पाहीले तर जेव्हा तुमची खरेदी पूर्ण होतं. त्यानंतर बिल पे केले जाते. ते बिल घेवून तुम्ही बाहेर जाण्यासाठी निघता. त्याच वेळी तुम्हाला गेटवर थांबवले जाते. तिथे एखादी व्यक्ती तुमचे बिल चेक करते. त्यानंतर ती व्यक्ती त्या बिलावर तिन रेषा मारते. त्या तीन तिरक्या रेषांचा अर्थ असा असतो की, तुमचे बिल पूर्णपणे आणि काळजीपूर्वक चेक केले गेले आहे. तुमच्या ट्रॉली किंवा पिशवीतील सर्व वस्तू बिलाप्रमाणे तपासून झाल्या आहेत. ग्राहकाला सर्व वस्तू व्यवस्थित मिळाल्या आहेत, हे या रेषांमुळे निश्चित होते. यामुळे कोणत्याही वस्तूची चोरी किंवा गैरप्रकार रोखण्यास मदत होते.

- Siya Goyal: सिया गोयलचे 'ते' अश्लील कृत्य! त्यात ही आता नवा वाद, वडिलांनी केला भलताच दावा

​बिलाच्या अगदी वरच्या बाजूला पेनने एक आकडा लिहिला जातो. हा आकडा म्हणजे तुमच्याकडे खरेदी केलेल्या सामानाच्या एकूण किती पिशव्या (Bags) आहेत याची संख्या असते. जर तुमच्याकडे 2 पिशव्या असतील तर तिथे 2 लिहिले जाते. यामुळे एक्झिट गेटवरील सुरक्षा रक्षकाला तुमच्याकडे असलेल्या पिशव्यांची संख्या आणि बिलावरील आकडा मॅच करून पाहणे सोपे जाते. यामुळे गर्दीच्या वेळी गोंधळ टाळता येतो आणि सुरक्षा व्यवस्था देखील कडक राहते.

- Lohagad Case: सिया-चेतनला मोठा दिलासा! बाहेर येण्याचा मार्ग मोकळा, कोर्टाच्या निर्णयाने पुणे पोलीसांना झटका

​DMart हे आज प्रत्येक कुटुंबाचे हक्काचे खरेदीचे ठिकाण बनले आहे. एकाच छताखाली मिळणारे सर्व सामान आणि 'बाय वन गेट वन फ्री' सारख्या आकर्षक ऑफर्समुळे ग्राहक येथे धाव घेतात. तसेच सेल्फ सर्व्हिस असल्यामुळे ग्राहकांना आपल्या आवडीनुसार वस्तू निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते. परंतु, खरेदीच्या या धावपळीत अनेक ग्राहक एका गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. ती गोष्ट म्हणजे बिल काउंटरवर किंवा एक्झिट गेटवर बिलावर मारल्या जाणाऱ्या तीन तिरक्या रेषा आणि त्यावर लिहिलेला एक आकडा. जवळपास 99 टक्के लोकांना याचा अर्थच माहित नसतो. पण ही बातमी वाचून तुम्हाला त्याचा अर्थ नक्कीच समजला असेल.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NDTV Marathi