Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Eknath Shinde : परभणीत शिंदेंची शिवसेना बदलली? 'बाण' आणि 'खान एकत्र! काय आहे कारण?

Eknath Shinde : परभणीत शिंदेंची शिवसेना बदलली? 'बाण' आणि 'खान एकत्र! काय आहे कारण?

नझीर खान, प्रतिनिधी

Parbhani Hingoli MLC election 2026: शिवसेनेच्या राजकारणात आजवरची सर्वात गाजलेली आणि आक्रमक घोषणा म्हणजे 'खान हवा की बाण हवा'. मात्र, आता राजकारणाचे वारे नेमके उलटे वाहू लागले असून, ज्या परभणीत या घोषणेने ध्रुवीकरण झाले, तिथेच आता एक नवा राजकीय पेच निर्माण झाला आहे.

शिवसेनेचं परभणीत 'मुस्लीम कार्ड'

शिवसेना आणि हिंदुत्व हे समीकरण आजवर अतूट मानलं गेलं. विशेषतः उद्धव ठाकरेंनी जेव्हा मुस्लीम उमेदवारांना संधी दिली, तेव्हा एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर हिंदुत्व सोडल्याची टोकदार टीका केली होती. मात्र, आता त्याच शिंदेंच्या शिवसेनेने परभणी-हिंगोली विधानपरिषद निवडणुकीसाठी सईद खान यांना उमेदवारी देऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. कालपर्यंत ज्यांच्या नावाने हिंदू मतांचे ध्रुवीकरण केले, आज त्याच सईद खान यांच्यासाठी शिंदेंची शिवसेना मते मागणार आहे.

( Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची Good News तयार, तरीही अधिकृत घोषणा का रखडली? वाचा सविस्तर )

शिंदेंची टीका आता त्यांच्यावरच उलटली?

काही महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये ठाकरे गटाने रशीद मामू किंवा हारुन खान यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी 'हा हिंदुत्वाचा धनुष्यबाण आहे' असे म्हणत शिंदेंनी ठाकरेंवर कडाडून टीका केली होती. आता मात्र सत्तेच्या आणि मतपेटीच्या गणितासाठी शिंदेंनी स्वतःच मुस्लीम कार्ड खेळल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. शिंदे बोलतात एक आणि करतात भलतंच, अशी टीका आता विरोधकांकडून केली जात आहे.

परभणीतील निर्णायक 'मुस्लीम फॅक्टर'

परभणी शहर आणि जिल्हा हा नेहमीच निर्णायक मुस्लीम मतांसाठी ओळखला जातो. या जागेवर विजय मिळवण्यासाठी मुस्लीम मतांची बेरीज करणे कोणत्याही पक्षासाठी अनिवार्य असते. याच राजकीय अपरिहार्यतेपोटी शिंदेंच्या शिवसेनेने सईद खान यांना रिंगणात उतरवले आहे. मात्र, यामुळे कट्टर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमध्ये आणि मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, धनुष्यबाण आता खानाच्या खांद्यावर गेल्याची चर्चा रंगली आहे.

( Dombivli News: डोंबिवली हादरली! पोलीस कर्मचाऱ्याच्या मृत्यूला पत्नीच जबाबदार? तपासात समोर आले धक्कादायक वास्तव )

विरोधकांचा टोकदार वार

या भूमिकेवर ठाकरे गटाने जोरदार आक्षेप घेतला आहे. अंबादास दानवे यांनी शिंदेंच्या या दुटप्पी भूमिकेवर टीका करताना म्हटले आहे की, आम्ही त्यांच्यासारखी नालायक भूमिका घेणार नाही. ज्या मुद्द्यावर शिंदेंनी शिवसेना फोडली आणि हिंदुत्वाचा जप केला, आता त्याच हिंदुत्वाच्या बाणाला मुस्लीम उमेदवाराची साथ घ्यावी लागल्याने शिंदेंची शिवसेना बॅकफूटवर गेल्याचे चित्र दिसत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NDTV Marathi