Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
High Uric Acid Symptoms: युरिक अ‍ॅसिड वाढलंय? युरिक अ‍ॅसिड म्हणजे काय? जाणून घ्या लक्षणं आणि 5 रामबाण उपाय

High Uric Acid Symptoms: युरिक अ‍ॅसिड वाढलंय? युरिक अ‍ॅसिड म्हणजे काय? जाणून घ्या लक्षणं आणि 5 रामबाण उपाय

High Uric Acid: बदलेली जीवनशैली आणि आहाराच्या चुकीच्या सवयींमुळे आजकाल शरीरात युरिक अ‍ॅसिड वाढण्याची समस्या सामान्य झाली आहे. रक्तात याचे प्रमाण वाढल्यास ते सांध्यांमध्ये जमा होऊ लागते.

यामुळे सांधेदुखी, तीव्र सूज आणि प्रामुख्याने पायाच्या अंगठ्यामध्ये असह्य वेदना सुरू होतात. वेळेवर नियंत्रण न ठेवल्यास हा त्रास अधिक वाढू शकतो. शरीरातील हे युरिक अ‍ॅसिड नेमके का वाढते? त्याची मुख्य लक्षणे कोणती आणि घरगुती उपायांनी ते कसे कमी करावे? याबाबत डॉ. रुचा पै यांनी दिलेली माहिती सविस्तर जाणून घेऊया...

तुमचं पण युरिक अ‍ॅसिड वाढलंय का?

सांधेदुखी, सूज, अंगठ्याला वेदना होत असतील तर हे .

युरिक अ‍ॅसिड म्हणजे काय? | What is Uric Acid?

रक्तातला एक टाकाऊ घटक (Waste Product). शरीराला थोडं आवश्यक असतं.
पण एका पातळीच्या वर याचे प्रमाण वाढलं तर ते त्रासदायक ठरू शकतं.

शरीरात वाढलेलं युरिक अ‍ॅसिड जातं कुठे? | Where does excess Uric Acid go in the body?

  • हाडं आणि सांध्यांमध्ये साठतं
  • सांध्यांच्या ठिकाणी सूज येतं
  • दाह (Inflammation) होऊन वेदना होतात

युरिक अ‍ॅसिड लक्षणे | Symptoms of High Uric Acid

  • सांध्यांना सूज
  • पायाच्या अंगठ्याला तीव्र वेदना
  • पाय जमिनीला टेकू शकत नाही इतक्या वेदना होणे
  • दाह (Inflammation) आणि त्वचा लालसर होणे

( Honey Bee Attack: सावधान! मधमाश्यांच्या हल्ल्यानंतर करू नका ही चूक, शरीरात वेगाने पसरले विष; वाचा योग्य उपाय)

युरिक अ‍ॅसिड कमी कसं करायचं? | How to reduce Uric Acid?

या पाच गोष्टी लक्षात ठेवा

1. पाणी भरपूर प्या

किडनीद्वारे युरिक अ‍ॅसिड शरीराबाहेर फेकले जाते. पाणी व्यवस्थित प्यायल्यास अतिरिक्त युरिक अ‍ॅसिड सहजरित्या शरीराबाहेर फेकले (Flush Off) जाण्यास मदत मिळू शकते.

डॉ. रुचा पै यांनी शेअर केलेली पोस्ट वाचा

2. हे पदार्थ टाळा

आहारात प्युरिनयुक्त (Purine) पदार्थ कमी करा. वांगी, भेंडी, कोबी हे पदार्थ आहारात कमी ठेवा.

3. या गोष्टींचा आहारात समावेश करा

चेरी (Cherries), व्हिटॅमिन सी (Vitamin C), अँटी-ऑक्सिडंट्सचा आहारात जास्त प्रमाणात समावेश करा.

( White Discharge: महिलांनो व्हाइट डिस्चार्जमुळे त्रस्त आहात? या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, वाचा डॉ. रुचा पै यांनी सांगितलेले उपाय)

4. किडनीची कार्यप्रणाली (Kidney function)

  • आहार + पाणी नियंत्रणात ठेवा
  • आहारामध्ये नियंत्रण ठेवल्यास किडनीचे कार्य (Kidneys function) व्यवस्थित होऊ शकते.
  • युरिक अ‍ॅसिड वाढणार नाही
  • सांध्यांची सूज कमी होऊ शकते

5. घरगुती टिप

आलं + ओवा + तूप
तिन्ही एकत्र करा
एक छोटी गोळी तयार करा
दुपारी जेवणानंतर गोळी घ्या
पचन सुधारतं आणि युरिक अ‍ॅसिडची पातळई कमी होण्यास मदत होऊ शकते.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NDTV Marathi