Dailyhunt
HSC Result Update : बारावीचा महाराष्ट्र बोर्डाचा निकाल कधी लागणार? डिजीलॉकरवर मोठी अपडेट, कसा पाहाल निकाल?

HSC Result Update : बारावीचा महाराष्ट्र बोर्डाचा निकाल कधी लागणार? डिजीलॉकरवर मोठी अपडेट, कसा पाहाल निकाल?

Maharashtra HSC Result 2026 Date : महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता 12 वी च्या परीक्षेला 14 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. या विद्यार्थ्यांसाठी आता मोठी अपडेट समोर आली आहे. डिजीलॉकरच्या अधिकृत वेबसाईटवर निकालाबाबतचे मोठे संकेत देण्यात आले आहेत."Class 12th Result 2026 Coming Soon",असा मेसेज डिजी लॉकरच्या अधिकृत वेबसाईटवर पाहायला मिळत आहे.

निकाल प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचं संकेत या मेसेजद्वारे देण्यात आले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, हा निकाल मे महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर केला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसच 13 ते 25 मे दरम्यानही हा निकाल लागण्याची शक्यता आहे. हा निकाल दुपारच्या सुमारास एक वाजता ऑनलाईन पोर्टलवर उपलब्ध केला जाऊ शकतो.

या वेबसाईट्सवर पाहता येईल निकाल

विद्यार्थी खाली दिलेल्या वेबसाईट्सवर निकाल पाहू शकतील.
1) mahresult.nic.in
2) hscresult.mkcl.org
3) results.digilocker.gov.in
4) mahahsscboard.in

>> Mumbai Pune Expressway: मिसींग लिंकचा मुहूर्त ठरला, टोलबाबत मोठा निर्णय, अपघात अन् विलंबाला कायमचा ब्रेक

महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी या गोष्टींची काळजी घ्यावी. हॉल तिकिटवर असलेला त्यांचा बैठक क्रमांक आणि अर्जावरील आईच्या नावाची नोंद. सर्वात महत्त्वाचं म्हणजे विज्ञान, कला, वाणिज्य आणि व्यावसायिक शाखांचे निकाल एकाच वेळी जाहीर केले जाणार आहेत. गतवर्षी विज्ञान शाखेचा निकाल 97.35 टक्के लागला होता. यावर्षी निकालाचा टप्पा वाढणार असल्याची चर्चा शिक्षण क्षेत्रात आहे.

>> 'त्या' कार्यकर्त्याने CM देवेंद्र फडणवीसांना रक्ताने लिहिलं पत्र, पत्रात नेमकं काय? राजकीय वर्तुळात चर्चा

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NDTV Marathi