Dailyhunt
IPL 2026 RCB vs CSK: बंगळुरुच्या मैदानात चेन्नईचा धुव्वा उडवला, 251 धावांचं आव्हान देणाऱ्या RCB चा दणदणीत विजय

IPL 2026 RCB vs CSK: बंगळुरुच्या मैदानात चेन्नईचा धुव्वा उडवला, 251 धावांचं आव्हान देणाऱ्या RCB चा दणदणीत विजय

RCB vs CSK Match Update : आयपीएल 2026 चा अकरावा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये रंगला. चेन्नई सुपर किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.

त्यानंतर मैदानात उतरलेल्या आरसीबी संघाने चेन्नईच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. आरसीबीच्या फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडत 20 षटकांमध्ये 3 विकेट्स गमावून 250 धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे चेन्नईपुढे 251 धावांचं मोठं आव्हान होतं. चेन्नईचे फलंदाज हे टार्गेट गाठण्यासाठी मैदानात उतरले. आरसीबीने 200 धावांचा टप्पा पार केला. पण 20 षटकांमध्ये आरसीबीला टार्गेट गाठता आलं नाही. आरसीबी सर्वबाद 207 धावांपर्यंत पोहोचू शकली. त्यामुळे चेन्नईचा या सामन्यात 43 धावांनी विजय झाला.

डेव्हिडने 25 चेंडूत नाबाद 70 धावा कुटल्या

आरसीबीसाठी सलामीला उतरलेल्या फिल सॉल्ट आणि विराट कोहलीनं पॉवर प्ले मध्ये दमदार सुरुवात केली. सॉल्टने 30 चेंडूत 46 तर विराटने 18 चेंडूत 28 धावांची खेळी साकारली. त्यानंतर देवदत्त पड्डीकलने 29 चेंडूत 50 धावांची अर्धशतकी खेळी केली. या इनिंगमध्ये त्याने 2 षटकार आणि 5 चौकार मारले. त्यानंतर रजत पाटीदार आणि टीम डेव्हिडने तुफानी खेळी केली. पाटिदारने 19 चेंडूत 48,तर डेव्हिडने 25 चेंडूत नाबाद 70 धावा कुटल्या. या इनिंगमध्ये डेव्हिडने 8 षटकार आणि 3 चौकार मारले.

>> Ashok Kharat: देवदर्शनाच्या नावाखाली भोंदू खरातने केलेला नवा प्रताप उघड! मुंबई, ठाणे, धुळ्यातील 19 जण रडारवर

आरसीबीच्या गोलंदाजांनी चेन्नईच्या फलंदाजांच्या नाकीनऊ आणले. चेन्नईचा सलामीवीर फलंदाज संजू सॅमसन आणि कर्णधार ऋतुराज गायकवाड स्वस्तात माघारी परतले. संजूने(9),ऋतुराजने (7),आयुष म्हात्रे(1),सर्फराज खान (50),कार्तिक शर्मा (6),शिवम दुबे (18) धावांवर बाद झाला. तर प्रशांत वीरने 29 चेंडूत 43 धावा कुटल्या,

>> Pune News : इंदापूरात खळबळ! हॉटेल 96 कट्ट्यावर पोलिसांची धाड, महिला-तरुणींसह कंडोमचे 15 पाकिट सापडले अन्..

आरसीबीसाठी गोलंदाज जेकब डफीने 2,भुवनेश्वर कुमारने 3 आणि अभिनंदन सिंगने 2 विकेट घेतल्या. तर कृणाल पंड्याला 2 विकेट्स मिळाल्या. तर सीएसकेसाठी अन्शुल कंबोज, जेमी ओव्हरटन आण शिवम दुबेला प्रत्येकी एक विकेट मिळाली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NDTV Marathi