Chhatrapati Sambhajinagar Job Scam: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून तरुणांकडून पैसे उकळत त्यांना उत्तराखंडमध्ये डांबून ठेवल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे. याप्रकरणी 30 ते 40 तरुणांनी तक्रार दाखल केली असून वीरगाव पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.
नेमकं काय आहे हे प्रकरण? जाणून घ्या सविस्तर..
नोकरीच्या नावाखाली भयंकर छळ
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सरकारी नोकरी लाऊन देण्याचे आमिष दाखवत तरुणांकडून पैसे उकळत त्यांना उत्तराखंड येथे डांबून ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात जवळपास 30 - 40 तरुणांनी छत्रपती संभाजीनगरच्या वीरगाव पोलिस ठाणे गाठत तक्रार अर्ज दिला आहे. याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार वैजापूर तालुक्यातील काही तरुणांना सरकारी नोकरीचे आमिष दाखवून उत्तराखंड येथील रुद्रपूर तालुक्यातील छत्रपुर गावात बोलावून घेण्यात आले.
IRAN War Impact: इराण युद्धाचा अंबरनाथ-डोंबिवली MIDC ला फटका! दरमहा 1000 कोटींचे नुकसान
तेथे गेल्यावर यातील काही तरुणांकडून 35 हजार व काहींकडून त्यापेक्षाही अधिक रक्कम रोख स्वरूपात आरोपींनी घेतली. दरम्यान यानंतर त्यांना ट्रेनिंग दिले जाईल असे सांगण्यात आले. मात्र जेव्हा प्रत्यक्षात ट्रेनिंग सुरू झाली तेव्हा तरुणांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. ट्रेनिंग दरम्यान तरुणांना आणखी तरुण जोडावे लागतील असे सांगण्यात आले व जोडलेल्या एक तरुणामागे त्यांना अडीच हजार रुपये मिळतील असे सांगण्यात आले.
तरुणांची फसवणूक
यानंतर तरुणांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. मात्र त्यांना तेथे डांबून ठेवले गेले होते. नातेवाईकांचे फोन आले तर फोनवर तेथे आरोपी सांगतील तसेच बोलावे लागायचे व तेथून बाहेर देखील जाण्यास मनाई होती. मात्र यातील काही तरुण तेथून कसेबसे सुटून घरी परतले व घडलेला सर्व प्रकार पालकांना सांगितला. यानंतर या तरुणांनी वीरगाव पोलिस ठाणे गाठत लेखी तक्रार दिली.
धक्कादायक बाब म्हणजे अडकलेल्या तरुणांना अन्य तरूणांना आकर्षित करण्यासाठी सायकॉलॉजीचे लेक्चर दिले जायचे. या चेनमध्ये मित्रांना कस अट्रॅक्ट करायचं यासाठी विशेष सायकॉलॉजीचे लेक्चर दिले जायचे. ज्यामध्ये चेहऱ्यावरचे हाव भाव कधी काय बोलायचे हे त्यात शिकवले जायचे. या धक्कादायक प्रकाराने सर्वत्र खळबळ उडाली असून पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.
Raigad News: महाड हादरलं! खासगी क्लासच्या शिक्षकाकडून विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, पालकांमध्ये प्रचंड संताप

