Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
महागाईच्या काळात सासऱ्यांची भन्नाट शक्कल! धोंडे जेवणात जावयाला 'जी' भेट दिली त्याची सगळीकडेच चर्चा

महागाईच्या काळात सासऱ्यांची भन्नाट शक्कल! धोंडे जेवणात जावयाला 'जी' भेट दिली त्याची सगळीकडेच चर्चा

ओंकार कुलकर्णी

Dharashiv News: अधिक महिन्यानिमित्त जावयाला धोंडे जेवण देण्याची प्रथा आहे. या वेळी जावयाला सासरी बोलावलं जातं. त्यावेळी त्याला जेवणासोबतच गिफ्ट ही दिले जाते. आज ही सोन्याची अंगठी भेट देण्याची परंपरा ग्रामीण भागात जपली जाते.

मात्र वाढती महागाई, सोन्याचे गगनाला भिडलेले दर आणि पेट्रोल-डिझेलच्या सतत वाढणाऱ्या किंमती, यामुळे भूम तालुक्यातील ईट गावात एका सासऱ्याने जावयासाठी भन्नाट शक्कल लढवली आहे. त्यांनी जावयाला असं एक गिफ्ट दिलं आहे त्याने जावई तर खूश झालाच, पण त्या गिफ्टची चर्चा ही संपूर्ण जिल्ह्यात रंगली.

ईट येथील क्रांतीसिंह राऊत यांना त्यांचे सासरे विलास झांबरे यांनी धोंडे जेवणानिमित्त चक्क सिंधी जातीची घोडी भेट दिली आहे. कोणतीही पूर्वकल्पना न देता शेतीच्या उपयोगाचं पार्सल पाठवलं आहे, ते स्वीकारा असा निरोप जावयाला देण्यात आला. प्रत्यक्षात सुंदर आणि देखणी सिंधी घोडी पाहताच जावयालाही सुखद धक्का बसला. पारंपरिक भेटींना फाटा देत उपयोगी आणि लक्षवेधी भेट देण्याचा सासऱ्यांचा हा हटके अंदाज जावयाला पसंत पडला. सध्या परिसरात याचीच चर्चा होताना दिसत आहे.

- Honeytrap News: मॅडमचं एक स्माईल 90 लाखांना पडलं! हनीट्रॅपचं आतापर्यंतच सर्वात हादरवून टाकणारं प्रकरण

सोन्याच्या किंमती सध्या गगनाला भिडल्या आहे. शिवाय रोजच्या रोज पेट्रोल डिझेलच्या किंमती ही वाढत आहेत. अशा वेळी जावयाला काय द्यावे असा प्रश्न सासऱ्याला पडला होता. मग त्यांनी ही नामी शक्कल लढवली. जावयाने सांगितलं की अधिक मासात धोंड्याचे जेवण असते. त्यावेळी भेटवस्तू ही दिली जाते. आपल्याला काय भेट देणार आहेत याची आपल्याला काही कल्पना नव्हती. आपल्याला सासऱ्यांनी शेतात जायला सांगितलं. शिवाय शेतीला उपयोगी पडेल अशी वस्तू तुम्हाला दिली आहे असा निरोप ही दिला.

- Beed News: गुन्हा दाखल होण्यास 8 तास, वैद्यकीय तपासणीसाठी 10 तास, अल्पवयीन अत्याचार पीडितेसह कुटुंबाची फरफट

त्यानंतर जावईबापू शेतात गेले. तिथे त्यांच्या समोर सिंधी जातीची घोडी होती. तिला पाहून त्यांना सुखद धक्का बसला. ही घोडी 17 ते 18 महिन्याची आहे. ही घोडी शांत स्वभावाची असते. शिवाय तिच्यावर राईड करणे सोपे आहे. जरी कोणी खाली पडला तरी ती त्याला सोडून जात नाही. ती तिथेच उभी राहते. सासऱ्यांनी दिलेली ही भेट आपल्याला आवडली. ती शेवटपर्यंत आपण सांभाळू असं ही त्यांनी सांगितलं. पेट्रोल डिझेलसाठी हा चांगला पर्याय असल्याचं ही ते म्हणाले. कुठे ही जाण्या येण्यासाठी घोडीचा उपयोग होवू शकतो असं ही त्यांनी सांगितलं.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NDTV Marathi