Missing Link Inauguration: मुंबई आणि पुणे या दोन शहरांमधील अंतर कमी करण्यासाठी आणि घाट क्षेत्रातील वाहतूक कोंडीतून प्रवाशांची मुक्तता करण्यासाठी अतिशय महत्त्वाकांक्षी असलेल्या 'मिसिंग लिंक' प्रकल्पाचे लोकार्पण 1 मे 2026 रोजी 'महाराष्ट्र दिनी' होणार आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) वतीने हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील प्रवास आता अधिक सुरक्षित, इंधन वाचवणारा, वेगवान आणि विनाअडथळा होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
1 मे रोजी दुपारी 12.30 वाजता खोपोली एक्झिटजवळील पूल क्रमांक 1 यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मार्गाचे लोकार्पण होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित राहणार आहेत. तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित राहणार आहेत.
गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील सर्वात रुंद बोगदा म्हणून नोंद
हा प्रकल्प केवळ रस्ता नसून आधुनिक अभियांत्रिकीचा एक अद्भुत नमुना आहे. याचे महत्त्वाचे आकर्षण म्हणजे यातील 23.5 मीटर रुंदीचा बोगदा, ज्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील सर्वात रुंद बोगदा म्हणून करण्यात आली आहे. हा बोगदा लोणावळा तलावाच्या चक्क 180 मीटर खालून खोदण्यात आला आहे.
मिसिंग लिंक प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये
केबल-स्टेड ब्रिज: प्रकल्पात 650 मीटर लांबीचा केबल-स्टेड ब्रिज असून त्याच्या पूल पायलॉन उंची 182 मीटर आहे, जो भारतातील सर्वात उंच रस्त्यावरील पूल ठरला आहे.
वेळेची बचत: घाट क्षेत्रातील वळणावळणाचे रस्ते आणि वाहतूक कोंडी टाळल्यामुळे प्रवासाचा कालावधी लक्षणीयरित्या घटवण्यासाठी मिसिंग लिंक प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
राज्यातील पायाभूत सुविधांच्या विकासातील हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात असून या प्रकल्पामुळे आर्थिक आणि औद्योगिक प्रगतीलाही गती मिळणार असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.

Photo Credit: NDTV Marathi
( Mumbai Pune Missing Link: मुंबई-पुणे मिसिंग लिंक कसा आहे? रोडचा फायदा काय? 'ही' आहेत वैशिष्ट्ये; A टू Z माहिती)
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिसिंग लिंकची केली पाहणी
मुंबई - पुणे प्रवासाचे अंतर 25 ते 30 मिनिटांनी घटणार

