Dailyhunt
Nagpur News: नागपुरात मायलेकीची एकाच वेळी आत्महत्या! सासू-पत्नीची संपत्ती हडपण्यासाठी नराधम पतीचं घाणेरडे कृत्य

Nagpur News: नागपुरात मायलेकीची एकाच वेळी आत्महत्या! सासू-पत्नीची संपत्ती हडपण्यासाठी नराधम पतीचं घाणेरडे कृत्य

- प्रवीण मुधोळकर, प्रतिनिधी Nagpur News: नागपुरातील व्यंकटेशनगर येथील आई आणि मुलीने एकाच वेळी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेने शहरात खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा तपास करत असताना नंदनवन पोलिसांनी धक्कादायक माहिती उघड केली आहे.

पत्नी आणि सासूच्या नावावर असलेली जमीन स्वतःच्या नावावर करण्यासाठी पती लोकेश ब्रह्मे आणि त्याच्या कुटुंबीयांनी केलेल्या मानसिक तसेच शारीरिक छळामुळेच या दोघींनी मृत्यूला कवटाळल्याचे समोर आले आहे.

पैशांसाठी छळ आणि बाळाचा मृत्यू

1 मे 2026 रोजी संगीता श्रीराम ढबाले (वय 52 वर्षे) आणि त्यांची मुलगी आकांक्षा लोकेश ब्रह्मे (वय 29 वर्षे) यांनी आत्महत्या केली होती. तपासात समोर आले की, आकांक्षाचे लग्न झाल्यापासूनच पती लोकेश, सासू अनसूया, सासरा सुधाकर, नणंद प्राची आणि तिचा पती अमोल डफ यांनी माहेरून पैसे आणण्यासाठी तिचा छळ सुरू केला होता. दोन महिन्यांपूर्वी आकांक्षाला मुलगी झाली, पण जन्मानंतर लगेचच त्या बाळाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर सासरच्या मंडळींनी आकांक्षाला अधिकच त्रास देण्यास सुरुवात केली.

( Pune Nasrapur News: नसरापूर बलात्कार प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा होणार? मुख्यमंत्री अ‍ॅक्शन मोडमध्ये,पोलिसांना दिल्या कडक सूचना)

जमिनीसाठी लावला तगादा

छळाची सीमा तेव्हा ओलांडली गेली जेव्हा आरोपींनी आकांक्षा आणि तिची आई संगीता यांच्या मालकीची जमीन लोकेशच्या नावावर करण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. तिला वारंवार मारहाण करून क्रूर वागणूक देण्यात आली. अखेर या सततच्या जाचाला कंटाळून आकांक्षा आपल्या आईच्या घरी (व्यंकटेशनगर) गेली आणि तिथे माय-लेकीने गळफास घेऊन आपले जीवन संपवले.

(: Nasrapur Crime News: छातीवर गंभीर वळ, नराधमाने क्रूरतेची सीमा ओलांडली! नसरापूरच्या चिमुकलीचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट वाचून अंगावर येईल काटा)

नंदनवन पोलिसांनी आकांक्षाचे मामा विलास केशवराव पिसे यांच्या तक्रारीवरून पती लोकेश ब्रह्मे याच्यासह सासरच्या पाच जणांविरुद्ध हुंडाबळी आणि छळवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NDTV Marathi