Dailyhunt
Nandurbar News : टायरची हवा तपासताना तरुणाचा मृत्यू; उन्हाळ्यात वाहनांकडे दुर्लक्ष करू नका!

Nandurbar News : टायरची हवा तपासताना तरुणाचा मृत्यू; उन्हाळ्यात वाहनांकडे दुर्लक्ष करू नका!

प्रशांत जव्हेरी, प्रतिनिधी

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील आज एक अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. उभ्या ट्रकच्या टायरमधील हवा तपासत असताना अचानक टायरचा स्फोट झाला.

या स्फोटाचा वेग आणि हवेचा दाब इतका प्रचंड होता की, यात ट्रक चालकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, सानेश्वर दिलीप मिस्तरी (वय ३७) असं मृत चालकाचं नाव आहे. सानेश्वर हे गुजरातहून सिमेंट भरलेला ट्रक घेऊन आले होते. ट्रक रिकामा करण्यापूर्वी ते नेहमीप्रमाणे गाड्यांच्या टायरची पाहणी करत होते. टायरमधील हवा तपासत असतानाच अचानक टायरचा मोठा आवाज होऊन स्फोट झाला.

नेमकं काय घडलं?

तळोदा शहरालगतच्या बायपास रोडवर आज एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. ट्रकच्या टायरमधील हवा तपासत असताना अचानक झालेल्या भीषण स्फोटात चालकाचा जागीच मृत्यू झाला. सानेश्वर दिलीप मिस्तरी या 37 वर्षीय चालकाचा दुर्देवी मृत्यू झालेला आहे. हा चालक गुजरातहून सिमेंट भरून आलेला ट्रक रिकामा करण्यापूर्वी टायरची तपासणी करीत होता. यावेळी टायरचा प्रचंड वेगाने ब्लास्ट झाला. हा स्फोट इतका भयानक होता की, हवेच्या दाबाने सानेश्वर याचा जागीच प्राण गेला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून एका कष्टकरी तरुणाच्या अशा अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी तळोदा पोलीस पुढील तपास करत आहेत.

- 'महाराष्ट्रात दर तासाला एक बलात्कार, दीड लाख महिला बेपत्ता'; आमदाराने दिली धक्कादायक आकडेवारी

टायरचा स्फोट का होतो?

यापूर्वीही अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. ज्यामध्ये टायरचा स्फोट झाल्यामुळे जखमी झाले आहेत. टायरचा स्फोट होण्यामागे अनेक कारणं सांगितली जातात. यापैकी टायरमध्ये कमी हवा असणं आणि अशा परिस्थितीत गाडी चालविल्यास टायर फुटण्याची भीती असते.याशिवाय क्षमतेपेक्षा जास्त वजन वाहून नेल्यास गाडीवर अतिरिक्त दाब पडतो. त्यातून निर्माण होणाऱ्या उष्णतेतून टायरचा स्फोट होऊ शकतो. याशिवाय उन्हाळ्यात लांब पल्ल्याच्या प्रवास किंवा सलग गाडी चालविल्यास टायर गरम होतात. जास्त उष्णतेमुळे टायरमधील हवा प्रसरण पावते, ज्यामुळे स्फोट होण्याची भीती असते. याशिवाय जुनं किंवा खराब टायर असल्यास अशा टायरचा स्फोट होण्याची शक्यता अधिक असते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NDTV Marathi