Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Nashik News: अर्धनग्न मांत्रिक, अंडी, लिंबू, कापूर अन् स्मशानात अघोरी पूजा, Video समोर येताच सर्वच जण हादरले

Nashik News: अर्धनग्न मांत्रिक, अंडी, लिंबू, कापूर अन् स्मशानात अघोरी पूजा, Video समोर येताच सर्वच जण हादरले

निलेश वाघ

राज्यात जादूटोणा प्रतिबंधक कायदा आहे. मात्र कायदा असला तरी अंधश्रद्धा कमी होण्याचं नाव घेत नाही. शिवाय या कायद्याचा धाक आहे का असा प्रश्नही निर्माण झाला आहे. त्याला कारण ही तसेच आहे.

नाशिक जिल्ह्यातील सटाण्यामध्ये स्मशानभूमीत अघोरी पुजा करण्याचा प्रकार समोर आला आहे. पुजा करताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. त्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली. महाराष्ट्र हा पुरोगामी समजला जातो. असं असताना अशा घटना होत असतील तर ते फार गंभीर म्हणायला हवे. दरम्यान या प्रकरणी पोलीसांनी तातडीने कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

- Shravan 2026: यंदा श्रावण महिना कधी सुरू होणार? जाणून घ्या श्रावणी सोमवारची यादी अन् शिवपूजेची अचूक पद्धत

मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी एका अर्धनग्न मांत्रिकासह स्मशानभूमीत अघोरी पूजा केली. त्यावेळी तंत्रमंत्र विधी केल्याचा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिकच्या सटाण्यातील जुन्या अमरधाममध्ये ही अघोरी पुजा झाला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मध्यरात्री काही संशयित व्यक्ती आलिशान वाहनांमधून जुन्या अमरधाम परिसरात दाखल झाले होते. त्यामुळे सुरूवातीला त्यांच्यावर कोणाचा संशय आला नाही. त्यांच्या सोबत भगवे वस्त्र धारण केलेला अर्धनग्न मांत्रिकही असल्याचे सांगितले जात आहे.

- Baba Vanga: बाबा वेंगाची भविष्यवाणी! जूनच्या पहिल्या आठवड्यात 'या' राशींना लागणार जॅकपॉट, त्या राशी कोणत्या?

या व्यक्तींने स्मशानभूमीतील चितास्थळाजवळ जाऊन अघोरी पूजा सुरू केली. या पूजेसाठी अंडी, लिंबू, उडीद, कवड्या, फुले, कापूर, नारळ तसेच इतर तांत्रिक साहित्याचा वापर करण्यात आल्याचे घटनास्थळी आढळून आले. पूजा संपल्यानंतर हे साहित्य तेथेच टाकून देण्यात आले. विशेष म्हणजे, घटनास्थळावरून काही संशयास्पद वस्तू सोबत नेण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी अमरधाम परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयितांचा शोध घ्यावा, तसेच जादूटोणा प्रतिबंधक कायदा' अंतर्गत गुन्हे दाखल करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NDTV Marathi