Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Palghar News: पालघर हादरलं! भोंदूबाबाकडून अल्पवयीन मुलीवर स्मशानभूमीत अत्याचार

Palghar News: पालघर हादरलं! भोंदूबाबाकडून अल्पवयीन मुलीवर स्मशानभूमीत अत्याचार

Palghar News: राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असतानाच, पालघरच्या डहाणू तालुक्यातून माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. एका 55 वर्षीय भोंदू बाबाने अघोरी पूजेच्या नावाखाली 13 वर्षांच्या चिमुकलीवर स्मशानभूमीजवळ लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे.

काय आहे नेमकी घटना?

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित चिमुकलीच्या मोठ्या बहिणीला मासिक पाळीदरम्यान होणारा रक्तस्त्राव थांबत नव्हता. यावर अघोरी पूजा आणि औषध देण्याचे आमिष दाखवून भोंदू बाबाने कुटुंबाला विश्वासात घेतले. रात्री 12 वाजण्याच्या सुमारास एका स्मशानभूमीजवळ ही अघोरी पूजा आयोजित करण्यात आली होती. पूजेच्या बहाण्याने आरोपीने या 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले.

(- DMart VIDEO: डीमार्टमध्ये जात असाल तर सतर्क राहा! एक चूक महागात पडेल)

भोंदू बाबाला बेड्या

घटनेची माहिती मिळताच पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी प्रकरणाची तातडीने दखल घेतली. कासा पोलिसांनी तांत्रिक तपास आणि माहितीच्या आधारे अवघ्या दोन तासांत 55 वर्षीय आरोपीला बेड्या ठोकल्या. आरोपीवर पोक्सो (POCSO) कायद्यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीवर सध्या कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

(- IPL 2026: रोहित, रिकल्टन, पुरनने सामना गाजवला; चर्चा रघु शर्माच्या चिठ्ठीची, मजकूर वाचून सगळेच भावुक)

या घटनेमुळे पालघर परिसरात संतापाची लाट उसळली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या तालुकाध्यक्षा वैभवी सबनीस यांनी या प्रकरणाचा तीव्र निषेध व्यक्त केला असून, अशा भोंदू बाबांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NDTV Marathi