Dailyhunt
Pandharpur News: प्लानिंग करून बायकोला संपवलं; पोलीस तपासात WhatsApp-Instagram कनेक्शन आलं समोर

Pandharpur News: प्लानिंग करून बायकोला संपवलं; पोलीस तपासात WhatsApp-Instagram कनेक्शन आलं समोर

संकेत कुलकर्णी, पंढरपूर

सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे निर्माण होणाऱ्या कौटुंबिक वादाने पंढरपुरात एका महिलेचा बळी घेतला आहे. पत्नी सातत्याने व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्रामवर चॅटिंग करते, या रागातून आणि तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीची निर्घृण हत्या केली.

पोलिसांनी अत्यंत चातुर्याने सोशल मीडिया स्टेटसचा वापर करत या प्रकरणाचा तपास पूर्ण केला आहे.

दोन वेगवेगळ्या नोंदी अन् एकच मृतदेह

या प्रकरणाचा तपास सुरू झाला तेव्हा पोलिसांसमोर दोन वेगवेगळ्या नोंदी होत्या. शहर पोलीस ठाणे येथे एक महिला बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाली होती. तर ग्रामीण पोलीस ठाणे येथे एका अनोळखी महिलेचा मृतदेह सापडल्याची नोंद करण्यात आली होती. तपासाअंती या दोन्ही नोंदी एकाच महिलेच्या असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

(- LPG Price Hike: महागाईचा भडका! LPG सिलिंडर दरात मोठी वाढ, चेक करा नवे दर)

सोशल मीडियामुळे गुन्ह्याचा उलगडा

महिलेचा मृत्यू नैसर्गिक नसून हत्या असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला. पोलिसांनी मृत महिलेचे इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲप स्टेटस तपासले. महिलेच्या सोशल मीडियावरील ॲक्टिव्हिटी आणि मोबाईल लोकेशनच्या माहितीवरून पोलिसांना संशयास्पद धागेदोरे मिळाले. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पतीकडे कसून चौकशी केली असता, त्याने हत्येची कबुली दिली.

(- Pune News: पुण्यात 'बंट्या' गोळ्यांचा मोठा साठा जप्त, 'फुलचंद पान' कनेक्शनमुळे खळबळ)

संशय आणि रागातून हत्या

पोलीस तपासात समोर आले की, संबंधित महिला सोशल मीडियावर सतत कोणाशी तरी चॅटिंग करत असे. याच कारणावरून पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत होते. पतीने तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन अखेर टोकाचे पाऊल उचलले आणि तिची हत्या केली. पोलिसांना आरोपी पतीला अटक केली असून अधिक तपास सुरु आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NDTV Marathi