Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Petrol Diesel Rate: 1 मेपासून पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, गाडीची टाकी फुल करण्यापूर्वी चेक करा नव्या किंमती

Petrol Diesel Rate: 1 मेपासून पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, गाडीची टाकी फुल करण्यापूर्वी चेक करा नव्या किंमती

Petrol Diesel Rate Today: मे महिन्याच्या सुरुवातीलाच सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतीत मोठी चढ-उतार सुरू असतानाही, देशातील सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणतेही बदल केलेले नाही.

इंडियन ऑइल (IOC) ने स्पष्ट केले आहे की, किरकोळ ग्राहकांसाठी इंधन दर स्थिर राहतील, ज्यामुळे देशातील 90 टक्के ग्राहकांना महागाईपासून दिलासा मिळाला आहे.

कंपन्यांनी स्पष्ट केले आहे की, इंधनाच्या दरात सर्वसामान्यांवर परिणाम करणारी कोणतीही सुधारणा झालेली नाही, ज्यामुळे लोकांच्या खिशावर कोणताही अतिरिक्त भार पडणार नाही. पण आपल्या वाहनाची टाकी भरण्यापूर्वी आपल्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर काय आहेत, जाणून घ्या सविस्तर माहिती...

प्रमुख शहरांमधील आजचे दर (प्रति लीटर)

  • मुंबईत पेट्रोल 103.54 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 90.03 रुपये प्रति लिटर किंमतीने विकले जात आहे.
  • नवी दिल्लीत पेट्रोलचे दर 94.77 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर 87.67 रुपये प्रति लिटरनुसार स्थिर आहेत.
  • कोलकातामध्ये पेट्रोलची किंमत 105.41 रुपये प्रति लिटर तर डिझेलचे भाव 92.02 रुपये प्रति लिटर इतके आहेत.
  • चेन्नईमध्ये पेट्रोल 100.80 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.39 रुपये प्रति लिटर किमतीने विकले जात आहे.
  • बंगळुरूमध्ये पेट्रोल 102.92 रुपये प्रति लिटर तर डिझेल 90.99 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

कच्च्या तेलाचे भाव पुन्हा वाढले

पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा वाढ झाली आहे. ब्रेंट क्रूडच्या किंमतीत (Brent Crude) 1.2 टक्क्यांनी वाढ होऊन प्रति बॅरल नवे दर $111.70 इथेपर्यंत पोहोचले आहेत. विशेष म्हणजे गुरुवारी (30 एप्रिल) हे दर $126.41 या चार वर्षांतील उच्चांकी पातळीवर गेले होते, त्या तुलनेत आज किमती किंचित कमी आहेत. दुसरीकडे अमेरिकन क्रूडचा देखील $105.64 दरानुसार व्यवहार सुरू आहे.

(: LPG Price Hike: महागाईचा भडका! LPG सिलिंडर दरात मोठी वाढ, चेक करा नवे दर)

तेल कंपन्यांना मोठा तोटा

कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतीचा थेट परिणाम तेल कंपन्यांच्या नफ्यावर होत आहे. रिपोर्टनुसार, पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमती स्थिर असल्याकारणाने सरकारी तेल कंपन्यांना प्रति लिटर विक्रीमागे मोठा तोटा सहन करावा लागत आहे. तेल कंपन्यांना पेट्रोलवर जवळपास 14 रुपये आणि डिझेलवर 18 रुपये प्रति लिटर नुकसान सहन करावे लागत आहे. ही परिस्थिती कंपन्यांसाठी आव्हानात्मक आहे, कारण खर्च वाढला असूनही सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी किमती वाढवण्यात आलेल्या नाहीत.

Photo Credit: NDTV Marathi

अफवांवर विश्वास ठेवू नका: सरकारचे आवाहन

देशात इंधनाचा तुटवडा असल्याच्या काही अफवा पसरवल्या जात आहेत. " पण देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. नागरिकांनी 'पॅनिक बाइंग' करू नये आणि कोणत्याही अफवांना बळी पडू नये." असे आवाहन पेट्रोलियम मंत्रालयाकडून सर्वसामान्यांना करण्यात आले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NDTV Marathi