Dailyhunt
PF withdraw: आता ATM मधून काढता येणार PF चे पैसे! जाणून घ्या संपूर्ण स्टेप बाय स्टेप प्रक्रिया

PF withdraw: आता ATM मधून काढता येणार PF चे पैसे! जाणून घ्या संपूर्ण स्टेप बाय स्टेप प्रक्रिया

नोकरी करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या पगारातून ठराविक रक्कम भविष्य निर्वाह निधी म्हणजेच PF साठी कापली जाते. कठीण काळात आर्थिक आधार देणारी ही रक्कम आता अधिक सुलभतेने काढता येणार आहे.

केंद्र सरकार पीएफ खात्याला बँकिंग गेटवेसह जोडण्याच्या तयारीत आहे. यामुळे आता चक्क ATM आणि UPI द्वारे पीएफचे पैसे काढणे शक्य होणार आहे. यासाठी खातेधारकांना विशेष विड्रॉल कार्ड दिले जाईल. यामुळे आणीबाणीच्या काळात त्वरित निधी उपलब्ध होण्यास मदत होईल. विशेष म्हणजे, यासाठी केवळ ऑनलाइन क्लेमची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल, ज्यानंतर एटीएममधून रोकड मिळवता येईल.

कसे काढता येतील ATM मधून पैसे?
नव्या पद्धती नुसार पीएफचे पैसे एटीएममधून काढणे सोपे होणार आहे. पीएफ खातेधारकांना लवकरच 'विड्रॉल कार्ड' (Withdrawal Card) दिले जाणार आहे. हे कार्ड अगदी सामान्य बँक एटीएम कार्डसारखेच असेल. ते थेट तुमच्या पीएफ खात्याशी लिंक असेल. या कार्डच्या माध्यमातूनच तुम्ही तुमचे पीएफचे पैसे काढू शकता.

- Do You Know: जिलेबीला इंग्रजीत काय म्हणतात? तुम्हाला माहित आहे का? उत्तर ऐकून थक्क व्हाल

या सुविधेचा लाभ घेण्यासाठी खातेधारकाला सुरुवातीला हव्या असलेल्या रकमेसाठी ऑनलाइन क्लेम करावा लागेल. एकदा क्लेम मंजूर झाला की, विड्रॉल कार्डच्या मदतीने कोणत्याही एटीएम मशीनमधून पीएफची रक्कम रोख स्वरूपात काढता येईल. या क्रांतीकारक निर्णयामुळे लाखो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. या प्रक्रियेत कर्मचाऱ्यांना एक विड्रॉल कार्ड मिळेल, जे पीएफ खात्याशी संलग्न असेल. आधार आणि पॅन लिंक असलेल्या खातेधारकांना या सुविधेचा प्राधान्याने लाभ घेता येईल. बँकिंग गेटवेच्या वापरामुळे पीएफ विड्रॉलची प्रक्रिया अधिक मानवी हस्तक्षेपमुक्त आणि सुलभ होणार आहे.

महत्त्वाच्या अटी आणि आवश्यक कागदपत्रे

  • ही सुविधा मिळवण्यासाठी काही गोष्टींची पूर्तता करणे अनिवार्य आहे.
  • तुमचा UAN (Universal Account Number) सक्रिय असणे आवश्यक आहे.
  • UAN शी लिंक असलेला मोबाईल नंबर सुरू असावा.
  • खाते आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँक खात्याशी जोडलेले असावे.
  • या प्रक्रियेसाठी ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा आणि बँक खात्याचा तपशील असलेला रद्द केलेला चेक (Cancelled Cheque) ही कागदपत्रे जवळ ठेवावीत.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NDTV Marathi