Dailyhunt
Pune Metro: मेट्रो धावणार, पर्यावरणही जपणार! काय आहे हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचा ग्रीन पॅटर्न?

Pune Metro: मेट्रो धावणार, पर्यावरणही जपणार! काय आहे हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचा ग्रीन पॅटर्न?

सुरज कसबे, पिंपरी चिंचवड:

Hinjewadi Metro Tree Plantation: हिंजवडी आयटी पार्कमधील नोकरदारांसाठी सर्वात महत्त्वाचा ठरणारा माण- हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्ग 3 लवकरच सुरु होणार आहे.

जून महिन्यापासून ही मेट्रो सेवा सुरु होण्याची शक्यता आहे. या मेट्रोमुळे पुणेकरांचा प्रवास सुसाट होणार असतानाच दुसरीकडे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून पर्यावरणालाही प्राधान्य दिले आहे. त्यामुळेच या प्रकल्पांतर्गत बाधित झालेल्या जवळपास 1 हजार 305 झाडांच्या बदलत्यात 5 हजार 500 नव्या झाडांचे रोपण करण्यात आले आहे.

Pune News : इंदापूरात खळबळ! हॉटेल 96 कट्ट्यावर पोलिसांची धाड, महिला-तरुणींसह कंडोमचे 15 पाकिट सापडले अन्..

मेट्रो धावणार, पर्यावरणही जपणार!

याबाबत सविस्तर माहिती अशी की, हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्ग-३ प्रकल्पाचे काम करत असताना पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने शाश्वत विकासाचा नवा आदर्श निर्माण केला आहे. प्रकल्पासाठी बाधित झालेल्या झाडांच्या बदल्यात तब्बल ५ हजार ५०० नवीन वृक्षांची लागवड करण्यात आली असून, या सर्व झाडांनी शंभर टक्के मूळ धरले आहे.

विशेष म्हणजे, या मोहिमेत झाडांच्या देखरेखीसाठी आधुनिक क्यूआर कोड तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. वृक्ष संवर्धनामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सायन्स अँड टेक पार्कच्या मदतीने सर्व झाडांचे जिओ टॅगिंग करण्यात आले आहे. प्रत्येक झाडावर एक क्यूआर कोड असून, तो स्कॅन केल्यास नागरिकांना त्या झाडाची प्रजाती, त्याचे नाव आणि पर्यावरणातील महत्त्वाचा डेटा एका क्लिकवर उपलब्ध होत आहे.

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचा ग्रीन पॅटर्न..!

मेट्रो कामात एकूण १,३०५ झाडे बाधित झाली होती. त्यापैकी ७४८ झाडांचे सुरक्षितरीत्या पुनर्रोपण करण्यात आले. यातील ८० टक्के झाडे जगली असून, हिंजवडी फेज-२ मधील वनक्षेत्रात पुनर्रोपित केलेल्या झाडांना आता फळे-फुले येऊ लागली आहेत. उर्वरित ५५७ झाडे तोडावी लागली तरी, त्याची कसर भरून काढण्यासाठी ५,५०० नवीन झाडे लावून पर्यावरणाचा समतोल राखला गेला आहे.

ही झाडे पशुसंवर्धन विभाग, ताथवडे कास्टिंग यार्ड, बावधन एनडीए क्षेत्र, एनसीएल, पंचवटी, राजभवन आणि कृषी महाविद्यालय या विविध ठिकाणच्या परिसरात लावली आहे.

>> Shirdi News: "माझ्या मृत्यूला कॅप्टन खरात जबाबदार", भोंदूबाबाची शिर्डीतील 4 वर्षांपूर्वीची फाईल आली समोर

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NDTV Marathi