Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Pune Metro: पुणेकरांसाठी खुशखबर! हिंजवडी- शिवाजीनगर मेट्रो 'या' दिवशी धावणार; 12 स्थानकांचा समावेश

Pune Metro: पुणेकरांसाठी खुशखबर! हिंजवडी- शिवाजीनगर मेट्रो 'या' दिवशी धावणार; 12 स्थानकांचा समावेश

अजिंक्य धायगुडे पाटील, पुणे:

Pune Metro Hinjewadi Shivajinagar Opening Date: हिंजवडी-शिवाजीनगर या मार्गावरील मेट्रोच्या प्रतिक्षेत असलेल्या पुणेकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहेय माण हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो सुरु होण्याची तारीख अखेर निश्चित झाली आहे.

15 जूनपासून हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो धावणार आहे. या मार्गिकेमुळे आयटी सिटी हिंजवडीमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे.

Traffic Jam: विकेंड, सलग सुट्ट्यांचा फटका! 2 महामार्गांवर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी; प्रवासाआधी वाचा अपडेट

हिंजवडी- शिवाजीनगर मेट्रो कधीपासून धावणार?

पुणेकरांनो, ट्रॅफिकच्या कटकटीतून मुक्त होण्यासाठी सज्ज व्हा! बहुप्रतिक्षित हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो अखेर १५ जूनपासून प्रवाशांच्या सेवेत येत आहे. 'पुणे आयटी सिटी मेट्रो'च्या पहिल्या टप्प्यातील कामाला वेग आला असून, पहिल्या टप्प्यात हिंजवडी बाजूकडील १२ स्थानकांवर मेट्रोच्या फेऱ्या सुरू होतील. यामुळे हिंजवडीतील आयटी पार्कमध्ये जाणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

​या मार्गावर एकूण २३ स्थानके असून दुसऱ्या टप्प्यातील ११ स्थानके, ज्यामध्ये विद्यापीठ, बाणेर आणि शिवाजीनगर या महत्त्वाच्या भागांचा समावेश आहे, ती ऑक्टोबर २०२६ पर्यंत सुरू करण्याचे नियोजन आहे. पीएमआरडीए आयुक्त अभिजित चौधरी यांनी स्पष्ट केले की, कामाचा दर्जा आणि सुरक्षितता याला प्राधान्य देऊन थोडा विलंब झाला असला, तरी आता १५ जून ही तारीख निश्चित मानली जात आहे. या मेट्रोमुळे पुणे शहर आणि आयटी हबमधील अंतर कमी होणार असून, खासगी वाहनांवरील ताणही कमी होईल.

कोणकोणत्या स्थानकांचा समावेश?

मेगापोलिस सोसायटी इन मान, क्वाड्रॉन बिझनेस पार्क, डोहलर, इन्फोसिस फेज २, विप्रो टेक्नॉलॉजीज फेज २, पॉल इंडिया, शिवाजी चौक, कोर्टयार्ड बाय मॅरियट, वाकड चौक, बालेवाडी स्टेडियम, ऑर्किड हॉटेल, रामनगर ही पहिल्या टप्प्यात सुरु होणार आहेत. तर दुसऱ्या टप्प्यात हाय स्ट्रीट, बालेवाडी फाटा, बाणेर गाव, बाणेर, कृषी अनुसंध, यशदा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, आरबीआय, कृषी महाविद्यालय, शिवाजीनगर, जिल्हा व सत्र न्यायालय ही स्थानके सुरु होतील.

दरम्यान, पहिल्या टप्प्यात हिंजवडी आयटी हबमधील मान ते रामनगर या दरम्यान मेट्रो धावेल. यामुळे आयटी कर्मचाऱ्यांचा प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल. शिवाजीनगरपर्यंतचा संपूर्ण मार्ग पूर्ण झाल्यावर ही लाईन वनाज-रामवाडी आणि पीसीएमसी-स्वारगेट या मार्गांना जोडली जाईल, ज्यामुळे पुणेकरांना अखंडित प्रवासाचा अनुभव मिळेल.

Mumbai Water Cut: मुंबईकरांनो, पाणी भरुन ठेवा! तब्बल 30 तास 'या' 6 वॉर्डांमध्ये पुरवठा बंद, वाचा संपूर्ण यादी

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NDTV Marathi