Dailyhunt
Pune News: गुंजवणी धरणाच्या 'त्या' कामावरून शेतकरी आक्रमक,अख्खं वाल्हे गाव केलं बंद,शेतकऱ्यांच्या मागण्या काय?

Pune News: गुंजवणी धरणाच्या 'त्या' कामावरून शेतकरी आक्रमक,अख्खं वाल्हे गाव केलं बंद,शेतकऱ्यांच्या मागण्या काय?

देवा राखुंडे, प्रतिनिधी

Purandar Farmers Strike News : पुरंदर तालुक्यातील वाल्हे परिसरातून गुंजवणी धरणाच्या बंदिस्त पाईपलाईनच्या कामावरून शेतकरी पुन्हा आक्रमक झाले आहेत.आपल्या हक्काच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांनी आज गावबंद आंदोलन छेडलं.

वाल्हे परिसरातील शेतकऱ्यांनी 1993 च्या मूळ प्रवाही कालव्याच्या आराखड्यानुसारच पाईप लाईनचे काम करावे,या मागणीसाठी शेतकरी रस्त्यावर उतरले आणि प्रशासना विरोधात जोरदार आंदोलन केलं. या आंदोलनाला व्यापारी वर्गाने देखील उत्स्फूर्त पाठिंबा देत बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवली.

ल्हे गावापर्यंत शेतकरी आणि ग्रामस्थांचा मोठा मोर्चा

सकाळी सिद्धार्थनगरपासून वाल्हे गावापर्यंत शेतकरी आणि ग्रामस्थांचा मोठा मोर्चा निघाला."गुंजवणीचं पाणी आमचं हक्काचं","पाणी द्या,शेत वाचवा" अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.यानंतर ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिराच्या प्रांगणात सभा घेण्यात आली. या सभेत शेतकऱ्यांनी प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला.गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला.याचबरोबर,पाईपलाईन टाकताना शेतकऱ्यांची परवानगी घेतली जात नाही. काही ठिकाणी बनावट सह्यांच्या आधारे काम सुरू असल्याचे गंभीर आरोपही करण्यात आले.

>> Ashok Kharat: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठा ट्वीस्ट, पत्नी कल्पना खरातबाबत खळबळजनक माहिती समोर

आंदोलन दडपण्यासाठी शेतकऱ्यांना दिल्या धमक्या

संबंधित कंपनी वेळकाढूपणा करत असून प्रशासन त्याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. दरम्यान, आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांचा वापर करून गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याची तक्रारही यावेळी करण्यात आली.या आंदोलनात ॲड.फत्तेसिंग पवार,बाळासाहेब राऊत,विक्रमसिंह भोसले,सचिन लंबाते,सचिन देशपांडे यांच्यासह अनेक शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.गुंजवणीच्या पाण्यासाठी सुरू झालेला हा लढा आता आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

>> Jalna News: मदरशाच्या नावाखाली सर्वात भयंकर प्रकार, पोलिसांनी 13 अल्पवयीन मुलांची केली सुटका, नेमकं काय घडलं?

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NDTV Marathi