Dailyhunt
Pune News: पुणेकरांची LPG गॅसची समस्या कायमची मिटणार? पुणे महापौरांचं मोठं पाऊल

Pune News: पुणेकरांची LPG गॅसची समस्या कायमची मिटणार? पुणे महापौरांचं मोठं पाऊल

पुणे शहरातील नागरिकांना सुरक्षित आणि अखंडित इंधन पुरवठा व्हावा, यासाठी पुणे महानगरपालिका आता पाईप्ड नॅचरल गॅस (PNG) जोडणीवर अधिक भर देणार आहे. महापौर मंजुषा नागपुरे यांनी महाराष्ट्र नॅशनल गॅस लिमिटेड (MNGL) च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली.

यावेळी त्यांनी शहराच्या कानाकोपऱ्यात, विशेषतः दुर्गम आणि वंचित भागांत गॅस पाईपलाईनचे जाळे तातडीने विस्तारण्याचे निर्देश दिले.

कामाची मुदत आणि नागरिकांची सोय

बैठकीत महापौरांनी पाईपलाईन टाकण्यासाठी केल्या जाणाऱ्या खोदकामामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासावर चर्चा केली. सध्या सुरू असलेली सर्व खोदकामे आणि पाईपलाईन टाकण्याचे काम ठराविक मुदतीतच पूर्ण करावे, जेणेकरून सार्वजनिक गैरसोय होणार नाही. ज्या सोसायट्या किंवा वस्त्यांमध्ये अद्याप गॅस जोडणी पोहोचलेली नाही, तिथे प्राधान्याने कामे हाती घेण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या. प्रत्येक पुणेकर रहिवाशाला सुरक्षित, अखंडित आणि सुलभ गॅस पुरवठा करणे हे पुणे महानगरपालिकेचे (PMC) प्राधान्य असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले.

(- US-Iran War : इराणची नवी खेळी! होर्मुजमधून जहाज वाहतूक सुरू होणार, मात्र भारतासह अनेक देशांना फटका बसणार)

LPG टंचाईचे सावट आणि पीएनजीचा पर्याय

पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक ऊर्जा बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. युद्धामुळे भविष्यात घरगुती एलपीजी सिलिंडरचा तुटवडा निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील यंत्रणांनी स्थानिक स्वराज्य संस्थांना पीएनजी पायाभूत सुविधा वाढवण्याचे आवाहन केले आहे. सिलिंडरवर अवलंबून न राहता थेट पाईपलाईनद्वारे गॅस मिळावा, यासाठी महापालिका प्रशासन MNGL ला सर्वतोपरी सहकार्य करत आहे.

(- Iran-US War: पायलटला वाचवण्यासाठी महाभारतातील रणनीती आली कामी; शत्रूच्या घरात घुसून अमेरिकेचा 'माईंड गेम')

MNGL कडून रिपोर्ट सादर

बैठकीदरम्यान MNGL च्या प्रतिनिधींनी पुण्यातील सध्याच्या पाईपलाईन कव्हरेजचा अहवाल सादर केला. भविष्यातील विस्तारासाठी कोणती धोरणे आखली आहेत आणि कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे, याची माहिती त्यांनी महापौरांना दिली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NDTV Marathi