Dailyhunt
Pune Railway News: पुणेकरांचा प्रवास सुखकर होणार! मांजरी स्टेशनचा कायापालट तर रामटेकडीला मिळणार नवे स्टेशन

Pune Railway News: पुणेकरांचा प्रवास सुखकर होणार! मांजरी स्टेशनचा कायापालट तर रामटेकडीला मिळणार नवे स्टेशन

Pune News: पुणे रेल्वे विभागाने शहरातील वाढती गर्दी आणि रेल्वे वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी दोन महत्त्वाच्या प्रकल्पांची घोषणा केली आहे. पुणे-दौंड मार्गावरील मांजरी स्थानकाचा दर्जा वाढवून तिथे आधुनिक सुविधा पुरवण्यात येणार आहेत.

तर पुणे-मिरज मार्गावर रामटेकडी येथे नवीन 'ब्लॉक स्टेशन' उभारले जाणार आहे. या निर्णयामुळे रेल्वे गाड्यांच्या विलंबाची समस्या सुटण्यास मोठी मदत होणार आहे.

मांजरी स्थानकाचा 'B' कॅटेगरीत समावेश

सध्या मांजरी हे केवळ एक 'हाल्ट' (Flag Station) आहे, जिथे केवळ डेमू (DEMU) गाड्या थांबतात. मात्र, आता त्याचे रूपांतर 'B' श्रेणीतील स्थानकात केले जाईल.

बदल काय होणार?

सध्या हडपसर ते लोणी या 12 किमीच्या अंतरात एकावेळी एकच गाडी धावू शकते. मांजरी स्थानकाच्या अपग्रेडेशनमुळे या अंतराचे 6-6 किमीच्या दोन ब्लॉक्समध्ये विभाजन होईल. यामुळे एकाच वेळी दोन गाड्या या मार्गावरून धावू शकतील. परिणामी गाड्यांची वारंवारता (Frequency) वाढेल आणि विलंब कमी होईल. येथे नवीन लूप लाईन, आधुनिक सिग्नल यंत्रणा आणि प्रवाशांसाठी मूलभूत सुविधा उभारल्या जातील.

(- US-Iran War : इराणची नवी खेळी! होर्मुजमधून जहाज वाहतूक सुरू होणार, मात्र भारतासह अनेक देशांना फटका बसणार)

रामटेकडी येथे नवीन स्थानकाची निर्मिती

पुणे-मिरज मार्गावरील रेल्वे संचलन अधिक सक्षम करण्यासाठी रामटेकडी येथे नवीन स्थानक प्रस्तावित आहे. पुणे आणि सासवड रोड स्थानकांमधील अंतर कमी झाल्यामुळे गाड्यांची समांतर हालचाल करणे शक्य होईल. यामुळे लाईन कपॅसिटी वाढून मिरज मार्गावरील गाड्यांचे वेळापत्रक सुधारण्यास मदत होईल. या संपूर्ण प्रकल्पासाठी अंदाजे 40 कोटी खर्च अपेक्षित आहे. Hindustan Times ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

रेल्वे प्रशासनाची भूमिका

पुणे रेल्वे विभागाचे प्रवक्ते हेमंत कुमार बेहरा यांनी सांगितले की, "मांजरी आणि रामटेकडी येथील या विकासकामांमुळे रेल्वे संचलनाची कार्यक्षमता वाढणार आहे. प्रवाशांना चांगल्या पायाभूत सुविधा मिळतील आणि त्यांच्या प्रवासाचा वेळ वाचेल. वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करून हे पाऊल उचलले आहे."

(- Iran-US War Update: जगाचं टेन्शन वाढलं! इराण-US युद्ध पुन्हा भडकणार? युद्धविरामानंतर 24 तासात काय काय घडलं?)

'ब्लॉक स्टेशन' म्हणजे काय?

ब्लॉक स्टेशन हे सिग्नल यंत्रणेने सुसज्ज असते, जे दोन गाड्यांमध्ये सुरक्षित अंतर राखण्याचे आणि रेल्वे वाहतूक नियंत्रित करण्याचे काम करते. मांजरी आणि रामटेकडी येथे ही यंत्रणा कार्यान्वित झाल्यामुळे पुणे विभागातील रेल्वे ऑपरेशनला मोठी गती मिळणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NDTV Marathi