Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Pune School: विद्यार्थी, पालकांसाठी अत्यंत महत्त्वाचं! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल; पाहा नवे वेळापत्रक

Pune School: विद्यार्थी, पालकांसाठी अत्यंत महत्त्वाचं! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल; पाहा नवे वेळापत्रक

यशपाल सोनकांबळे, पुणे:

Pune Primary Schools New Timetable: पुणे महानगरपालिका क्षेत्रातील प्राथमिक शाळांच्या वेळेबाबत अत्यंत मोठी अन् महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. पुणे शहरातील सर्व महानगरपालिका आणि खासगी शाळांच्या वेळेमध्ये तात्पुरता बदल करण्यात आला आहे.

1 जुलैपासून 31 ऑगस्टपर्यंत हे नवे वेळापत्रक लागू राहणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. काय आहे नवीन वेळापत्रक? जाणून घ्या...

पुण्यातील प्राथमिक शाळांच्या वेळापत्रकात मोठा बदल

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या विशेष मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेसाठी पुणे शहरातील प्राथमिक शाळांमधील शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडणूक कामाचा आणि शालेय अध्यापनाचा समतोल राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुणे महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या वेळेत तात्पुरता बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आता या शाळा सकाळी ७ ते दुपारी १२.१५ या वेळेत सुरू राहणार आहेत.

Mumbai Rain LIVE: मुंबईत आजही मुसळधार! लोकलचा खोळंबा; वाचा LIVE अपडेट्स

​निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार, मतदार यादी पुनरीक्षणाचे काम अत्यंत महत्त्वाचे असून, ते निर्धारित कालावधीत पूर्ण करणे बंधनकारक आहे. यासाठी शिक्षकांना 'मतदान केंद्रस्तरीय अधिकारी' (BLO) म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शिक्षकांना शाळांनंतर या सरकारी कामासाठी वेळ मिळावा, या उद्देशाने शाळांच्या वेळेत कपात करण्यात आली आहे.

हा बदल ३१ ऑगस्टपर्यंत लागू राहणार आहे, अशी माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि शिक्षकांना निवडणूक कामेही वेळेत पूर्ण करता यावीत, असा दुहेरी प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे. पालकांनी या बदलाची नोंद घेऊन विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Maharashtra Rain: मुंबईत संततधार! रायगडसाठी रेड अलर्ट; राज्यात पावसाचा जोर कायम, कुठे-कुठे कोसळणार? वाचा...

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NDTV Marathi