Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Reelstar Rohini Paradhye Death: रीलस्टार रोहिणी पाराध्येने आत्महत्या का केली? उलटसुलट चर्चांना उधाण

Reelstar Rohini Paradhye Death: रीलस्टार रोहिणी पाराध्येने आत्महत्या का केली? उलटसुलट चर्चांना उधाण

संकेत कुलकर्णी, पंढरपूर

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी येथील प्रसिद्ध रील स्टार रोहिणी पाराध्ये हिने मंगळवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. रोहिणीच्या या धक्कादायक आत्महत्येचे नेमके कारण अद्याप पोलीस तपासात स्पष्ट झाले नसले, तरी तिच्या मृत्यूभोवती आता अनेक तर्कवितर्क आणि उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

मंगळवेढा पोलीस ठाण्यात सध्या या प्रकरणाची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. परंतु, स्थानिक पातळीवर आणि सोशल मीडिया वर्तुळात तिच्या आत्महत्येमागे कौटुंबिक वाद आणि व्यवसायाचा प्रचंड मानसिक तणाव असल्याचे बोलले जात आहे.

प्रेमविवाहानंतर व्यवसायाला सुरुवात

रोहिणी आणि तिचे पती निलेश पाराध्ये यांनी प्रेमविवाह केला होता. सुरुवातीला पुणे येथे काही काळ वास्तव्य करत असताना त्यांनी सोशल मीडियावर रील्स बनवण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर आपल्या मूळ गावी, ब्रह्मपुरी येथे परत आल्यावर त्यांनी 'हॉटेल ग्रामपंचायत' नावाचा स्वतःचा व्यवसाय सुरू केला.

(- Pimpri Chinchwad: प्रियकराची प्रेयसीला अमानुष मारहाण; पोलिसांनी तरुणीला गाठलं पण भलताच ट्विस्ट आला समोर)

हॉटेलमधील दैनंदिन आणि खेळीमेळीच्या वातावरणातील रील्समुळे हे दांपत्य अल्पावधीतच कमालीचे लोकप्रिय झाले आणि त्यांचे हॉटेलही यशाच्या शिखरावर पोहोचले. या यशानंतर त्यांनी मंगळवेढा तालुक्यातच आणखी दोन ठिकाणी नव्याने हॉटेलच्या शाखा सुरू केल्या.

व्यवसाय विस्ताराचा ताण आणि आर्थिक समतोल

मिळालेल्या माहितीनुसार, या दोन्ही नवीन शाखांचे व्यवस्थापन करणे, त्यांची आर्थिक घडी नीट बसवणे आणि हॉटेल उत्तम रीतीने चालवणे या गोष्टी करताना या दांपत्याची मोठी तारेवरची कसरत होत होती. याच वाढत्या व्यवसायाच्या व्यापामुळे आणि आर्थिक गणितांमुळे दोघांमध्ये काही दिवसांपासून वाद आणि मानसिक तणाव निर्माण झाल्याची जोरदार चर्चा आहे. याच रागाच्या भरात रोहिणीने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

सोमवारी सुट्टी, मंगळवारी दुकानाचा दरवाजाच उघडला नाही

रोहिणी आणि तिचे पती नीलेश हॉटेलच्या ठिकाणीच एकत्र राहत होते. सोमवारी हॉटेलची साप्ताहिक सुट्टी असल्याने ते बंद होते. मात्र, मंगळवारी नेहमीप्रमाणे हॉटेल उघडलेच गेले नाही. याच दरम्यान, दुपारी एक वाजण्याच्या सुमारास रोहिणीने स्वतःच्या स्वयंपाक खोलीत गळफास घेतल्याचे उघडकीस आले. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिची प्राणज्योत मालवली होती.

(- Mumbai-Pune: मुंबई-पुणे अंतर आता अवघ्या दीड तासांवर! 'ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे'वरून प्रवास होणार सुसाट)

दुसऱ्या विवाहाचीही चर्चा

या घटनेला अनेक कंगोरे असल्याचे समोर येत आहे. रोहिणीचा नीलेशसोबत हा दुसरा विवाह असल्याचेही समजते आहे. त्यामुळे नक्की दोघांमध्ये वैचारिक मतभेद होते, व्यवसायाचा आर्थिक ताण होता की अन्य काही खाजगी कारण होते? याबाबत पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. मंगळवेढा पोलीस या आत्महत्येचे गूढ उकलण्याचा प्रयत्न करत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NDTV Marathi