Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Shirdi News : 14 जण दगावले, तरीही हातभट्टी दारूचं व्यसन कमी होईना; मद्यपींची धक्कादायक मागणी

Shirdi News : 14 जण दगावले, तरीही हातभट्टी दारूचं व्यसन कमी होईना; मद्यपींची धक्कादायक मागणी

सुनील दवंगे, प्रतिनिधी

Shirdi News : विषारी हातभट्टीच्या दारूमुळे जीव जात असल्याच्या घटना सातत्याने समोर येत असतानाही गावठी दारूचं व्यसन काही कमी होताना दिसत नाही. काही दिवसांपूर्वी पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे हातभट्टीच्या विषारी दारूमुळे १४ हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

मात्र तरीही राज्यातील गावठी दारूचं व्यसन कमी होताना दिसत नाही.

शिर्डीसारख्या धार्मिक शहरातही हातभट्टी आणि गावठी दारूची खुलेआम विक्री सुरू असल्याचं चित्र समोर आलं आहे. विशेष म्हणजे महागड्या देशी दारूऐवजी कमी किमतीत मिळणारी पॉलिथिन पिशवीतील गावठी दारू पिण्याशिवाय पर्याय नसल्याची भूमिका अनेक मद्यपींनी मांडली आहे. काहींनी तर "दारू प्यायल्याशिवाय कामासाठी एनर्जीच येत नाही" अशी धक्कादायक प्रतिक्रिया देत देशी दारूचे दर कमी करण्याची मागणी थेट कॅमेरासमोर केली आहे.

शिर्डीतही हातभट्टी आणि गावठी दारूची सर्रास विक्री...

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी हातभट्टीच्या दारूमुळे चौदा जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाही राज्यभर गावठी दारूचा अवैध व्यवसाय मात्र अजूनही सुरूच असल्याचं वास्तव समोर येत आहे. साईबाबांची नगरी म्हणून ओळख असलेल्या शिर्डीतही अनेक ठिकाणी हातभट्टी आणि गावठी दारूची सर्रास विक्री होत असल्याचं दिसून येत आहे.

- 'हा धंदा सोपा नाय'; 'त्या' Video मध्ये हॉटेल ग्रामपंचायतीच्या मालकिणीच्या चेहऱ्यावर चिंता, रीलमध्येही उल्लेख

विशेषतः बिगारी कामगार, मजूर आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या अनेकांकडून कमी पैशात उपलब्ध होणाऱ्या पॉलिथिन पिशवीतील गावठी दारूला पसंती दिली जात असल्याचं दिसतं. NDTV मराठीच्या कॅमेरासमोर बोलताना अनेक मद्यपींनी महागडी देशी किंवा ब्रँडेड दारू परवडत नसल्याने गावठी दारू पिण्याशिवाय पर्याय नसल्याचं सांगितलं.

'दारू पिल्याशिवाय काम करण्यासाठी एनर्जी येत नाही'

काहींनी तर "दारू पिल्याशिवाय काम करण्यासाठी एनर्जी येत नाही," अशी धक्कादायक कबुली दिली. तसेच उच्च प्रतीच्या दारूचे दर कमी करावेत, म्हणजे सुरक्षित पर्याय परवडेल, अशी मागणी देखील त्यांनी केली. अनेकांच्या मते, अशा प्रकारची गावठी किंवा हातभट्टीची दारू शरीरासाठी अत्यंत घातक असून त्यामध्ये वापरले जाणारे रसायन, मिथेनॉल आणि इतर घटक थेट जीवावर बेतू शकतात. तरीही स्वस्त आणि सहज उपलब्धतेमुळे अनेक जण हा धोका पत्करत असल्याचं वास्तव चिंताजनक आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NDTV Marathi