Dailyhunt
Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांचा राजीनामा! त्यांच्या जागी 'या' 4 नावांची चर्चा, वर्णी कुणाची लागणार?

Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांचा राजीनामा! त्यांच्या जागी 'या' 4 नावांची चर्चा, वर्णी कुणाची लागणार?

राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. दिवंगत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आपल्या राज्यसभा खासदारपदाचा राजीनामा दिला आहे. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत दणदणीत विजय मिळवून आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

सुनेत्रा पवार यांनी दिल्लीत राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन आपला राजीनामा सुपूर्द केला. त्यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी राष्ट्रवादीत चार जणांची नावं चर्चेत आहेत.

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी 2,18,969 मताधिक्य मिळवत ऐतिहासिक विजय संपादन केला. या विजयासह त्यांनी अजित पवारांच्या विजयाचा विक्रमही मोडीत काढला आहे. आता त्या विधानसभेत जाणार असल्याने त्यांनी खासदारकी सोडली असून, त्यांच्या जागी राष्ट्रवादी काँग्रेस कोणाला संधी देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यसभेत जाण्यासाठी राष्ट्रवादी मध्ये काही प्रमुख नेते हे इच्छुक आहेत. त्या पैकी एकाला संधी देण्यात येईल. त्या नावावर सुनेत्रा पवारच अंतिम मोहर उमटवणार आहेत.

- Jalna News: नग्न केले, फोटो काढले, व्हिडीओ बनवले! 10 वर्ष शरीरसंबंध, लव्ह जिहादचं हादरवणारं प्रकरण

सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हालचालींना वेग आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, प्रामुख्याने तीन नावांची चर्चा सुरू आहे. त्यात छगन भुजबळ यांचे नाव सर्वात आघाडीवर आहे. सुनेत्रा पवारांना जेव्हा राज्यसभेवर पाठवले होते, तेव्हा छगन भुजबळ इच्छुक होते. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी आता त्यांना संधी दिली जाऊ शकते. दुसरं नाव हे जय पवार यांचे आहे. पार्थ पवार यांच्यानंतर आता जय पवार यांचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी त्यांना राज्यसभेवर पाठवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर तिसरं नाव हे नितीनकाका पाटील यांचे आहे. पश्चिम महाराष्ट्रातील समीकरणे लक्षात घेता नितीनकाका पाटील यांच्या नावाचाही विचार होऊ शकतो.

- Pune News: 13 वर्षाच्या मुलीचा गर्भपात, फलटणमधील डॉक्टरला अटक, मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश

याशिवाय समीर भुजबळ आणि आनंद परांजपे यांचीही नावे चर्चेत आहेत. त्यामुळे या पैकी एकाला संधी दिली जावू शकते. सर्वात आघाडीवर असलेलं नाही हे छगन भुजबळांचे आहे. भुजबळ राज्यसभेत गेल्यास त्यांची राज्य मंत्रिमंडळातील जागा रिक्त होईल. त्या ठिकाणी मंत्री म्हणून कदाचीत धनंजय मुंडे यांना संधी दिली जावू शकते. तर भुजबळांच्या रिक्त झालेल्या येवला विधानसभा मतदार संघातून पंकज किंवा समिर भुजबळ या दोघां पैकी एकाला संधी देवून त्यांचे पुनर्वसन केले जावू शकते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NDTV Marathi