Dailyhunt
West Bengal Election: धुणं-भांडी करणारी महिला थेट विधानसभेत! भाजपच्या कलिता माजी यांचा प्रेरणादायी प्रवास

West Bengal Election: धुणं-भांडी करणारी महिला थेट विधानसभेत! भाजपच्या कलिता माजी यांचा प्रेरणादायी प्रवास

BJP Mla Kalita Majhi: कालपर्यंत ज्या हातांनी दुसऱ्यांच्या घरात भांडी घासली आणि फरशी पुसली, आज त्याच हातांमध्ये जनतेने आपल्या नशिबाची चावी सोपवली आहे. पश्चिम बंगालच्या ऑसग्राम विधानसभा मतदारसंघातून आलेली ही बातमी एखाद्या चित्रपटाच्या कथेलाही मागे टाकेल अशी आहे.

भाजपच्या कलिता माजी यांनी सर्वच राजकीय दिग्गजांना धूळ चारत विधानसभेत दिमाखात एन्ट्री केली आहे.

कोण आहेत कलिता माजी?

कलिता माजी यांची ओळख आज एक आमदार म्हणून असली, तरी त्यांचा इथपर्यंतचा प्रवास अत्यंत संघर्षाचा राहिला आहे. राजकारणात येण्यापूर्वी कलिता गेल्या 20 वर्षांपासून लोकांच्या घरात कामगार म्हणून काम करत होत्या.

दरमहा केवळ 2500 रुपये त्या कमवत असत. या तुटपुंज्या कमाईतून त्या आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असत. गेल्या 10 वर्षांपासून त्या राजकारणात सक्रिय आहेत. त्यांनी एका बूथ-स्तरावरील कार्यकर्त्या म्हणून कामाला सुरुवात केली आणि त्यानंतर पंचायत निवडणुकाही लढवल्या.

(- DMart VIDEO: डीमार्टमध्ये जात असाल तर सतर्क राहा! एक चूक महागात पडेल)

1200 हून अधिक मतांनी विजय

कलिता माजी यांनी आपल्या मेहनतीने आणि जनसंपर्काने ऑसग्राम (SC) जागेवर मोठी आघाडी घेतली. त्यांनी 12,535 मतांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे. त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या श्यामा प्रसन्ना लाहौर यांचा पराभव केला. कलिता माजी यांना एकूण 1,07,692 मते मिळाली आहेत. त्यांनी घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर भर दिला होता.

(- IPL 2026: रोहित, रिकल्टन, पुरनने सामना गाजवला; चर्चा रघु शर्माच्या चिठ्ठीची, मजकूर वाचून सगळेच भावुक)

भाजपचा विश्वास

भाजपने 2021 च्या विधानसभा निवडणुकीतही कलिता यांच्यावर विश्वास टाकला होता. त्यावेळी त्यांना सुमारे 41% मते मिळाली होती, मात्र केवळ 12,000 मतांच्या फरकाने त्यांचा पराभव झाला होता. या पराभवाने खचून न जाता त्यांनी आपले काम सुरू ठेवले आणि अखेर यशाला गवसणी घातली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NDTV Marathi