Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
१२ वर्षांपूर्वीच अमित शाहांनी सांगितलेले पश्चिम बंगालचे भविष्य!

१२ वर्षांपूर्वीच अमित शाहांनी सांगितलेले पश्चिम बंगालचे भविष्य!

NEWS डंका 2 weeks ago

गृहमंत्री अमित शाह यांच्या जुन्या दाव्याची होतेय चर्चा

भारतीय जनता पक्षाने (भाजप) सोमवारी पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचा सुपडा साफ करून राज्यात बहुमताचा आकडा गाठला. पश्चिम बंगालमधील गेल्या १५ वर्षांची तृणमूलची सत्ता भाजपने संपुष्टात आणली.

यासोबतच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या जुन्या व्हिडीओची चर्चा होऊ लागली असून भाजपला मिळालेला हा विजय एका रात्रीत मिळालेला नाही हे स्पष्ट होते. ज्या राज्यात दशकभरापूर्वी भाजपचे अस्तित्व जवळजवळ नव्हतेच, त्या राज्यातील सोमवारच्या निकालामुळे, डिसेंबर २०१४ मध्ये भाजप नेते अमित शाह यांनी कोलकाता येथे घेतलेल्या शपथेची आठवण झाल्याचे बोलले जात आहे.

कोलकात्याच्या धर्मातळा येथील एका सभेत अमित शाह गर्दीसमोर उभे राहिले आणि ममता बॅनर्जींनी त्यांच्याबद्दल विचारलेल्या एका प्रश्नाची आठवण त्यांनी सांगितली. 'अमित शाह कोण आहेत?' असे त्यांनी बारा वर्षांपूर्वी, विचारले होते, असे शाह यांनी आठवले. त्यांचे उत्तर साधे होते, 'मी अमित शाह, भाजपचा एक छोटा कार्यकर्ता आहे,' असे शाह म्हणाले आणि पुढे म्हणाले, 'मी बंगालच्या भूमीतून तृणमूल काँग्रेसला मुळापासून उखडून टाकण्यासाठी येथे आलो आहे.'

भाजपला हा विजय मिळवून देण्यात अमित शाह यांनी मध्यवर्ती भूमिका बजावली असून २०१६ मध्ये भाजपने बंगालमध्ये तीन जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत, २०२६ मध्ये पूर्ण बहुमत मिळवण्यापूर्वी, भाजपने ७७ जागा जिंकल्या. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात, शाह यांनी राज्यात जवळपास दोन आठवडे तळ ठोकला होता. दिवसा ते ५० हून अधिक सभा आणि रोडशोंना संबोधित करत होते, तर दुसरीकडे जमिनीवरील प्रचाराला अंतिम स्वरूप देण्यासाठी राज्य नेत्यांसोबत रात्री उशिरापर्यंत रणनीती बैठका घेत होते. त्यांच्या टीमने महिलांची सुरक्षा, भ्रष्टाचार आणि प्रशासकीय अपयश यांसारख्या प्रमुख मतदार समस्यांवर लक्ष केंद्रित केले. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सातवा वेतन आयोग लागू करणे आणि कडक कायदा व सुव्यवस्थेचे आश्वासन देणे यांसारख्या शाह यांच्या जाहीर घोषणा मतदारांना भावल्याचे दिसते.

भारताला मिळणार एआय ऑर्बिटल डेटा सेंटर सॅटेलाइट!

आसाम काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गौरव गोगोईंची हार

तिरुवनंतपुरममध्ये भाजपने तीन विधानसभा जागा जिंकल्या

तामिळनाडूमधील कोलाथूरमध्ये मुख्यमंत्री स्टॅलिन पराभूत

४ मे रोजी भाजपने राज्यात सत्ता मिळवून इतिहास रचला त्याच वेळी पुन्हा हा व्हिडीओ समोर आला. याचे कारण म्हणजे शहा यांनी दिलेले वचन खरे ठरल्याचे बोलले जात आहे. सोमवारी भाजपने १४८ जागांचा बहुमताचा आकडा सहज पार केला असून सरकार स्थापन करण्यास सज्ज झाले आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार स्थापन करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka