Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
१३ चेंडूत अर्धशतक! उर्विल पटेलची चेपॉकवर षटकारांची सुनामी

१३ चेंडूत अर्धशतक! उर्विल पटेलची चेपॉकवर षटकारांची सुनामी

NEWS डंका 2 weeks ago

आयपीएल इतिहासातील संयुक्तरित्या सर्वात जलद अर्धशतक

यपीएल २०२६ मधील ५३व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) आणि लखनऊ सुपर जायंट्स (एलएसजी) आमनेसामने आले. एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात सीएसकेचा फलंदाज उर्विल पटेल याने आयपीएल इतिहासातील संयुक्तरित्या सर्वात जलद अर्धशतक झळकावत इतिहास रचला.

उर्विलने अवघ्या १३ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. यासह त्याने यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी केली. जैस्वालने २०२३ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध १३ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले होते.

या यादीत दुसऱ्या क्रमांकावर केएल राहुल, पॅट कमिन्स आणि रोमारियो शेफर्ड यांचा समावेश आहे. या तिघांनीही १४ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले होते. राहुलने २०१८ मध्ये पंजाबकडून खेळताना दिल्लीविरुद्ध हा पराक्रम केला होता. तर कमिन्सने मुंबई इंडियन्सविरुद्ध कोलकात्याकडून खेळताना १४ चेंडूंमध्ये फिफ्टी ठोकली होती. रोमारियो शेफर्डने २०२५ मध्ये आरसीबीकडून खेळताना चेन्नईविरुद्ध १४ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले होते.

उर्विलने आणखी एक खास विक्रम आपल्या नावावर केला. आयपीएल इतिहासात आपल्या डावातील पहिल्या ८ चेंडूंमध्ये ६ षटकार मारणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. त्याने पहिल्या ८ चेंडूंमध्ये तब्बल ४१ धावा केल्या.

उर्विलच्या स्फोटक फलंदाजीमुळे सीएसकेने पॉवरप्लेमध्ये १ बाद ९७ धावा केल्या. हा आयपीएलमधील चेन्नईचा पॉवरप्लेमधील दुसरा सर्वोच्च स्कोअर ठरला.

२०४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईला संजू सॅमसन आणि कर्णधार ऋतुराज गायकवाड यांनी दमदार सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी अवघ्या २२ चेंडूंमध्ये ४५ धावांची भागीदारी केली. सॅमसन १४ चेंडूंमध्ये २८ धावा करून बाद झाला.

त्यानंतर मैदानात उतरलेल्या उर्विलने चौकार-षटकारांची आतषबाजी करत सामना रंगतदार केला. त्याने २३ चेंडूंमध्ये २८२ च्या स्ट्राइक रेटने ६५ धावा फटकावल्या. या खेळीत त्याने २ चौकार आणि ८ षटकार लगावले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka