Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
३० दिवसांत 'धुरंधर २' ची १,७८३ कोटींची कमाई

३० दिवसांत 'धुरंधर २' ची १,७८३ कोटींची कमाई

NEWS डंका 1 month ago

बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी कायम

'धुरंधर: द रिवेंज' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपली दमदार कामगिरी कायम ठेवत ३० दिवस पूर्ण केले आहेत. अभिनेता रणवीर सिंह अभिनित स्पाय-अ‍ॅक्शन चित्रपटाने जगभरात १,७८३ कोटींची कमाई करत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

जिओ स्टुडीओज आणि B62 स्टुडीओज यांच्या बॅनरखाली बनलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य धर यांनी केले आहे. पाचव्या वीकेंडपर्यंतही चित्रपटाने मजबूत पकड कायम ठेवली असून त्याची लोकप्रियता अधोरेखित झाली आहे.

चित्रपटाने भारतात १,१५३ कोटींचे नेट कलेक्शन केले असून ग्रॉस कलेक्शन १,३६० कोटींवर पोहोचले आहे. तर परदेशी बाजारात चित्रपटाने ४२३ कोटींची कमाई केली आहे. अशा प्रकारे एकूण जागतिक कलेक्शन १,७८३ कोटी झाले आहे.

आठवड्यानुसार कमाईचा आढावा:

अमरावती व्हिडीओ प्रकरणातील १९ वर्षीय आरोपीकडे महिंद्रा थार, शस्त्रे, आयफोन आले कुठून?

महिलेवर अत्याचार करणाऱ्या मौलवीसह एकाला ठोकल्या बेड्या

पाकिस्तानमधील चर्चेसाठी इराणची पाठ!

ड्रोन आयात प्रकरणी लाचखोरीच्या आरोपावरून DGCA चे उपमहानिदेशक अटकेत

रणवीर सिंह याच्या १६ वर्षांच्या कारकिर्दीत हा चित्रपट त्याची मोठी कामगिरी मानली जात आहे. त्याच्या अभिनय कौशल्यासाठी आणि विविध भूमिकांसाठी तो आधीपासूनच ओळखला जातो. पण 'धुरंधर' फ्रँचायझीने त्याला बॉक्स ऑफिसवरील आघाडीच्या स्टार्समध्ये स्थान मिळवून दिले आहे.

याआधी 'धुरंधर'च्या पहिल्या भागानेही ९०० कोटींपेक्षा अधिक कमाई केली होती. आता या दोन्ही चित्रपटांचे एकत्रित जागतिक कलेक्शन ३,०१९ कोटींवर पोहोचले आहे. रिपोर्ट्सनुसार, या फ्रँचायझीने पुष्पा (२,२२१ कोटी), केजीएफ (१,४५३ कोटी) आणि बाहुबली (२,४३८ कोटी) यांसारख्या यशस्वी फ्रँचायझींनाही मागे टाकले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka