Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
६१ वर्षीय आमिर खान तिसऱ्यांदा हिंदू स्त्रीशीच झाला विवाहबद्ध

६१ वर्षीय आमिर खान तिसऱ्यांदा हिंदू स्त्रीशीच झाला विवाहबद्ध

NEWS डंका 2 weeks ago

मुंबईतील निवासस्थानी साध्या समारंभात नोंदणी विवाह

भिनेता आमिर खान आणि गौरी स्प्रॅट रविवारी अधिकृतपणे विवाहबद्ध झाले आहेत. शनिवारी दुपारी मुंबईतील वांद्रे येथील आमिर खान यांच्या निवासस्थानी कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत दोघांनी विवाहाची अधिकृत नोंदणी केली.

६१ वर्षीय आमिर आणि ४७ वर्षीय गौरी यांनी दुपारी सुमारे १२.४५ वाजता विवाह नोंदणीच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केली. आमीर खानची ही विवाहाची तिसरी वेळ असली तरी हा तिसरा विवाहदेखील हिंदू स्त्रीशीच आहे.

त्यावरून चर्चा रंगली आहे की, आमिर खानने इतक्या विवाहांपैकी एकही विवाह मुस्लिम स्त्रीशी का केला नाही? पहिला विवाह रिना दत्ता, दुसरा विवाह किरण राव यांच्याशी झाला आणि आता ही तिसरी विवाहाची वेळ आहे. त्याशिवाय, रिना दत्ता यांच्याशी केलेल्या विवाहानंतर मुलांची नावे मात्र मुस्लिमच ठेवण्यात आली. ती का असा सवालही उपस्थित होत आहे.

या विवाह सोहळ्याला सुमारे १५० पाहुणे उपस्थित होते. यामध्ये कुटुंबीय, जवळचे मित्र तसेच परदेशातून आलेले नातेवाईक सहभागी झाले होते. आमिरची मुले जुनैद, आयरा आणि आझाद, तसेच गौरीचा मुलगाही या समारंभाला उपस्थित होता.

यावर्षीच्या सुरुवातीला आमिर आणि गौरी यांनी आपल्या नात्याची अधिकृत घोषणा केली होती. आमिरने सांगितले होते की, दोघांची जवळपास २५ वर्षांपासून ओळख होती, मात्र त्यांनी दोन वर्षांपूर्वी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली.

जम्मू-काश्मीरच्या शोपियात फळबागेत लपले लष्करचे दोन अतिरेकी; शोध सुरू

दिमित्रोवची जिद्द जिंकली; विंबल्डनमध्ये चौथ्या फेरीत धडक

श्रद्धेचा पैसा लुटून उभारली कोट्यवधींची संपत्ती!

क्रिप्टोचं 'ब्लॅक नेटवर्क' अमेरिकेसाठी डोकेदुखी

आमिर खानचे पूर्वीचे विवाह

आमिरचा पहिला विवाह निर्माती रिना दत्ता यांच्याशी झाला होता. त्यांना जुनैद आणि आयरा ही दोन मुले आहेत. त्यानंतर २००५ मध्ये त्यांनी दिग्दर्शिका किरण राव यांच्याशी विवाह केला. २०२१ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला, मात्र ते आजही मुलगा आझादचे सह-पालकत्व सांभाळत आहेत.

गौरी स्प्रॅट यांच्याविषयी

गौरी स्प्रॅट या मूळच्या बंगळुरूच्या असून त्यांनी आतापर्यंत प्रसिद्धीपासून स्वतःला दूर ठेवले आहे. त्या माजी सलून व्यावसायिक रीटा स्प्रॅट यांच्या कन्या आहेत आणि सौंदर्य व वेलनेस क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, त्यांनी ब्ल्यू माउंटन स्कूलमध्ये शिक्षण घेतले असून २००४ मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ द आर्ट्स लंडन येथे स्टायलिंग आणि फोटोग्राफीचा एफडीए अभ्यासक्रम पूर्ण केला. सध्या त्या मुंबईमध्ये बीब्लंट सलूनचे संचालन करतात. आमिर आणि गौरी यांनी आपला विवाहसोहळा अत्यंत खासगी ठेवला असून, केवळ कुटुंबीय आणि अतिशय जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत हा समारंभ पार पडला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka