Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
८ वर्षांच्या लक्ष्यने बनवले इंटरनेटशिवाय चालणारे AI स्टोरीटेलर

८ वर्षांच्या लक्ष्यने बनवले इंटरनेटशिवाय चालणारे AI स्टोरीटेलर

NEWS डंका 3 weeks ago

७६० रुपये किंमतीच्या मायक्रोकंट्रोलरचा वापर करून बनवले डिव्हाइस

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रात मोठमोठ्या कंपन्या अब्जावधी रुपयांची गुंतवणूक करत असताना, अवघ्या ८ वर्षांच्या लक्ष्य या चिमुकल्याने केवळ ७६० रुपये किंमतीच्या मायक्रोकंट्रोलरचा वापर करून इंटरनेटशिवाय चालणारे व्हॉइस-कंट्रोल्ड AI स्टोरीटेलिंग डिव्हाइस तयार केले आहे.

विशेष म्हणजे हे उपकरण Wi-Fi, क्लाउड सेवा किंवा कोणत्याही API शिवाय पूर्णपणे ऑफलाइन कार्य करते. या अभिनव प्रकल्पाची सध्या तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी चर्चा होत आहे.

लक्ष हा 'Projects by Laksh' या उपक्रमाचा सह-संस्थापक असून, त्याने हा प्रकल्प ESP32-S3 मायक्रोकंट्रोलर, INMP441 मायक्रोफोन, I2S स्पीकर आणि MAX98357A अॅम्प्लिफायर यांच्या मदतीने विकसित केला आहे. कमी किमतीच्या हार्डवेअरवर कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर कसा करता येतो, याचे हे उत्तम उदाहरण मानले जात आहे.

या AI उपकरणाचे वैशिष्ट्य म्हणजे ते वापरकर्त्याच्या आवाजातील आदेश समजून क्षणात नवीन कथा तयार करू शकते, ती मोठ्याने वाचून दाखवते, स्क्रीनवर साधे अॅनिमेशन दाखवते आणि 'Play', 'Pause', 'Resume' आणि 'Next Story' यांसारख्या व्हॉइस कमांडनुसार काम करते. इंटरनेटशी कोणताही संपर्क नसतानाही सर्व प्रक्रिया डिव्हाइसवरच पार पडते.

हा प्रकल्प तयार करण्यासाठी लक्ष्यने slvDev या डेव्हलपरने विकसित केलेल्या TinyStories LLM for ESP32 या ओपन-सोर्स लँग्वेज मॉडेलमध्ये आवश्यक बदल केले. मूळ मॉडेल केवळ ऑफलाइन कथा तयार करू शकत होते. मात्र लक्ष्यने त्यात व्हॉइस इंटरॅक्शन, स्टोरी प्लेबॅक कंट्रोल आणि अॅनिमेशन यांसारखी नवीन वैशिष्ट्ये जोडून त्याला अधिक उपयुक्त आणि संवादक्षम बनवले.

डेमोदरम्यान लक्ष्यने 'Make a funny story' अशी व्हॉइस कमांड दिल्यानंतर डिव्हाइसने काही क्षणांत एक नवीन विनोदी कथा तयार केली. त्यानंतर AI ने ती कथा स्वतःच्या आवाजात सांगितली आणि त्याचवेळी स्क्रीनवर संबंधित अॅनिमेशनही दाखवले. कथा सुरू करणे, थांबवणे, पुन्हा सुरू करणे किंवा पुढील कथा ऐकणे हे सर्व केवळ आवाजाच्या आदेशांद्वारे नियंत्रित करता येत असल्याचे त्याने दाखवून दिले.

सागरी कर्मचाऱ्यांच्या पुरवठ्यात भारत जगात दुसरा; रशिया-चीनलाही टाकले मागे

पंतप्रधान मोदींबाबत आक्षेपार्ह पोस्ट; एक्स खात्यांना नोटिसा

पाकव्याप्त काश्मीरमधील आंदोलक भारतासारखेच शत्रू!

सरकारी वाहनांच्या वापरावर केंद्राची नवी शिस्त; 'वन ऑफिसर, वन कार' नियम

तंत्रज्ञान तज्ज्ञांच्या मते, हा प्रकल्प एज AI संकल्पनेचे प्रभावी उदाहरण आहे. यामध्ये सर्व AI प्रक्रिया क्लाउडऐवजी थेट उपकरणावरच होते. त्यामुळे इंटरनेटची गरज लागत नाही, प्रतिसाद अधिक जलद मिळतो आणि वापरकर्त्याच्या माहितीची गोपनीयताही अधिक सुरक्षित राहते. विशेषतः दुर्गम भागातील शिक्षण, कमी इंटरनेट सुविधा असलेले क्षेत्र आणि मुलांसाठी स्मार्ट शिक्षण साधने विकसित करण्यासाठी अशा तंत्रज्ञानाचा मोठा उपयोग होऊ शकतो.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka