Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
८८ कोटींच्या घोटाळ्याच्या सूत्रधाराच्या पत्नीला यूएईतून आणले भारतात

८८ कोटींच्या घोटाळ्याच्या सूत्रधाराच्या पत्नीला यूएईतून आणले भारतात

NEWS डंका 2 weeks ago

इंटरपोलच्या रेड नोटिसच्या आधारे सीबीआयची कारवाई

८८ कोटी रुपयांच्या गुंतवणूक फसवणूक प्रकरणातील मुख्य सूत्रधार अविनाश राठोड याची पत्नी विशाखा राठोड हिला संयुक्त अरब अमिरातीतून (UAE) भारतात आणण्यात सीबीआयला मोठे यश मिळाले आहे.

इंटरपोलच्या रेड नोटिसच्या आधारे यूएई प्रशासनाच्या सहकार्याने ही कारवाई करण्यात आली. भारतात आणल्यानंतर पुणे विमानतळावर महाराष्ट्र पोलिसांच्या पथकाने तिला ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे.

सीबीआयने परराष्ट्र मंत्रालय (MEA) आणि केंद्रीय गृहमंत्रालय (MHA) यांच्या समन्वयाने विशाखा राठोडला ३ ऑगस्ट रोजी यूएईतून भारतात आणले. तिच्याविरोधात भारतीय तपास यंत्रणांच्या विनंतीवरून इंटरपोलने रेड नोटिस जारी केली होती. भारतात दाखल होताच पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) तिला ताब्यात घेतले.

तपासानुसार, अविनाश राठोड, विशाखा राठोड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गुंतवणूकदारांना विविध योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास दरमहा निश्चित परतावा मिळेल, असे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणात पैसे उभे केले. मात्र, गुंतवणूकदारांचा पैसा आश्वासनाप्रमाणे वापरण्याऐवजी तो विविध बँक खाती आणि डीमॅट खात्यांमध्ये वळवून अपहार करण्यात आल्याचा आरोप आहे. या घोटाळ्यात सुमारे ८८ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा तपास यंत्रणांचा दावा आहे.

या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि सूत्रधार अविनाश राठोड यालाही यापूर्वी इंटरपोलच्या रेड नोटिसच्या आधारे यूएईत अटक करण्यात आली होती. त्यानंतर २३ जुलै रोजी त्याला भारतात आणण्यात आले. मुंबई विमानतळावर उतरल्यावर पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने त्याला अटक केली होती. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली असून त्याची चौकशी सुरू आहे.

शेख हसीनांच्या पत्रकार परिषदेत सहभागी होताच शाकिब यांच्या घरावर हल्ला

ट्रम्प थोडक्यात बचावले; हेलिकॉप्टर- प्रवासी विमान समोर येताच काय घडले?

'बांगलादेश दुसरा पाकिस्तान बनत आहे'

सुनेत्रा पवार प्रकरणावरून धनंजय मुंडेंना सुनील तटकरेंचा इशारा

विशाखा राठोडच्या अटकेनंतर या घोटाळ्यातील आर्थिक व्यवहार, निधीचा प्रवाह, तसेच इतर संभाव्य आरोपींची भूमिका याचा तपास अधिक वेगाने होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग होता का, तसेच गुंतवणूकदारांचा पैसा कुठे वळवण्यात आला, याचा शोध आर्थिक गुन्हे शाखा आणि सीबीआय घेत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka