Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
आशाताईंची ती अखेरची पोस्ट खूप काही सांगून गेली!

आशाताईंची ती अखेरची पोस्ट खूप काही सांगून गेली!

NEWS डंका 1 month ago

इंस्टावर लिहिली होती आठवण

सूरसम्राज्ञी आशा भोसले यांचं नुकतंच निधन झालं. आशा भोसले यांच्या आठवणींनी अवघी माध्यमे व्यापली आहेत. त्यांची गाणी, त्यांच्यासोबत गाणारे गायक, त्यांनी ज्या संगीतकारांसोबत काम केले, त्या आठवणी, त्यांचे वैयक्तिक आयुष्य, त्यांचा संघर्ष, त्यांच्या गाण्याची शैली अशा असंख्य आठवणींनी आसमंत व्यापून टाकला आहे.

एक अष्टपैलू गायिका म्हणून त्यांची उणीव कायम संगीतसृष्टीला, समाजाला जाणवणार आहे.

आशाताईंनी आपल्या या अखेरच्या काळात गोरिल्लाझ या बँडसोबत एक गाणे केले. हे त्यांचे त्यांच्यासोबतचे पहिलेच गाणे होते. शॅडोवी लाइट्स हा ट्रॅक होता. फेब्रुवारीत हा अल्बमचे लोकार्पण झाले. त्याबद्दल आशाताई म्हणाल्या होत्या की, मी असे गाणे यापूर्वी कधी केले नव्हते पण या गाण्यातून मला माझाच नवा शोध घेता आला. या गाण्याचे बोल, त्याचे संगीत ऐकल्यानंतर हा माझाच प्रवास असल्याचे मला वाटले. त्यातील एक ओळ अशी होती…चल मेरे माझी, गेहरा है पानी मुझे जाना है उस पार….यासंदर्भातली त्यांची पोस्ट इन्स्टावर १८ मार्चला प्रकाशित झाली होती. ती त्यांच्या जीवनाचा अंतिम प्रवास कुठेतरी सूचित करत होती का, असे नक्कीच वाटून जाते.

लेखिका जयश्री देसाई यांनी या संपूर्ण पोस्टचा अनुवाद केला. त्या पोस्टमध्ये त्यांनी ' इंटरनॅशनल गोरिल्लाज' या बँडसोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोच्या बॅकग्राऊंडमध्ये भारतीय वस्ती, हत्ती आणि काही मोडकळीस आलेल्या वस्तू दिसत आहेत. फोटोमध्ये आशाताई अत्यंत शांत आणि साध्या अवतारात दिसत आहेत.

'पहलगाम हल्ल्यामुळे पाकिस्तानला सन्मान मिळाला'; लष्कर कमांडरचा दावा

झांसीत हिंदू विद्यार्थिनींना धर्मांतरित करू पाहणारा शिक्षक सोहेलला अटक

अलविदा आशाताई!

नोएडात वेतनवाढीच्या आंदोलनाला हिंसक वळण

या पोस्ट मध्ये त्या म्हणतात , या बँडचं shadowi light हे गाणं माझ्यासाठी गहन अर्थ घेऊन आलेलं आहे.
त्यात त्या पुढे लिहीतात 'वाराणसीला जाऊन पवित्र गंगा नदीतून प्रवास करताना मी जे काही जवळून पाहिलं त्यातून मला आयुष्याचा अर्थ समजला. मी कोण आहे आणि पृथ्वीवर मला काय करायचं आहे हे कळलं. 'द शॅडोवी लाईट'मध्ये या खोल नदीचं पार करणं म्हणजे माझ्या आयुष्याचा प्रवास आहे.
माझा जन्म, माझी नाती, माझं संगीतावरील समर्पण, माझी यशस्वी वाटचाल आणि मुलगी, आई, बहीण, पत्नी आणि एक हिंदू भारतीय म्हणून माझी कर्तव्यं. या प्रवासात बोट चालवणारा नावाडी म्हणजे माझं संगीत आहे. जे मला आयुष्याच्या या नदीतून जाताना मार्गदर्शन करतं.'
पोस्टमध्ये पुढे लिहिलंय, 'जेव्हा मी या नदीच्या दुसऱ्या काठावर पोहोचेन तेव्हा माझा प्रवास पूर्ण होईल. मला मोक्ष प्राप्त होईल. अंतिम मुक्ती. त्या अवस्थेत मी आपल्या आजूबाजूला तरंगणाऱ्या हजारो आवाजांपैकी एक होईन.'
त्या आवाजांपैकी काही एकत्र आले तर एक सुंदर धून तयार होते. त्यामुळे मीही त्या ध्वनिंपैकी एक होईन जो पुढे जाऊन एका सुंदर गाण्याचा सूर बनेल…. असं गाणं जे हजारो वर्षं अनेक पिढ्या ऐकतील. निसर्गाशी एकरूप होण्याची हीच खरी मुक्ती मला त्या दुसऱ्या काठावर मिळणार आहे!
आशाताईंची संगीतसाधना किती मोठी होती याचेच हे उदाहरण आहे. त्या साधनेतूनच त्यांना जीवनानंतरचा हा दुसरा किनारा दिसला. मोक्षप्राप्तीची दिशा कळली. आशा भोसले यांच्यावर सोमवारी अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या स्मृती चिरंतन राहणार आहेत. त्यांना न्यूज डंकाच्या वतीने आदरांजली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka