Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
आत्महत्या रोखण्यासाठी संशयित आरोपी आता नव्या गणवेशात

आत्महत्या रोखण्यासाठी संशयित आरोपी आता नव्या गणवेशात

NEWS डंका 1 month ago

कैद्यांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय;

पोलीस कोठडीत असलेल्या आरोपींची सुरक्षा अधिक कडक करण्यासाठी आणि अनुचित प्रकार रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

शहरातील सामान्य पोलीस कोठडीत असलेल्या आरोपींसाठी आता 'एकसारखा पोशाख' (Uniform) लागू करण्यात आला आहे. या निर्णयामुळे आता लॉकअपमधील प्रत्येक आरोपी एकाच विशिष्ट गणवेशात दिसणार आहे.

मरून टी-शर्ट आणि शॉर्ट्सची ओळख…..

नव्या नियमानुसार, पोलीस कोठडीत पाठवण्यात आलेल्या पुरुष संशयितांना आता मरून रंगाचे टी-शर्ट आणि शॉर्ट्स दिले जात आहेत. अटक केल्यानंतर जोपर्यंत आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली जात नाही किंवा त्याची जामिनावर मुक्तता होत नाही, तोपर्यंत त्याला हाच पोशाख परिधान करावा लागणार आहे.

मोदींची भविष्यवाणी… पश्चिम बंगालमधील विक्रमी मतदान परिवर्तनासाठी

भारत-जर्मनी संरक्षण सहकार्याला नवी चालना

आत्महत्यांना लगाम…….

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा उपक्रम प्रामुख्याने आरोपींच्या सुरक्षेसाठी राबवण्यात आला आहे. कोठडीत असताना आरोपींनी स्वतःचे कपडे (उदा. शर्ट, पँट, नाडी किंवा बेल्ट) वापरून आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या किंवा आत्महत्या केल्याच्या घटना काही काळामध्ये समोर आल्या होत्या. अशा घटनांना आळा घालण्यासाठी आणि आरोपींवर अधिक प्रभावीपणे लक्ष ठेवण्यासाठी सुरक्षित कापडापासून बनवलेला हा गणवेश लागू करण्यात आला आहे.

'अनेकदा आरोपी नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलतात. एकसारखा आणि सुरक्षित डिझाइन असलेला हा पोशाख अशा घटना रोखण्यास मदत करेल,' असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांतर्गत अटक केलेल्या व्यक्तींना सुरुवातीला स्थानिक स्तरावर आणि नंतर आवश्यकते नुसार सामान्य (General) लॉकअपमध्ये ठेवले जाते. या सर्व ठिकाणी आता या नवीन नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू झाली आहे. या निर्णयामुळे कोठडीतील शिस्त राखण्यास आणि आरोपींची ओळख पटवणे अधिक सुलभ होणार असल्याचेही बोलले जात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka