Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
आयएएस-आपीएस सेवेला 'रामराम'; १४ महिन्यांत ७ अधिकाऱ्यांचे राजीनामे

आयएएस-आपीएस सेवेला 'रामराम'; १४ महिन्यांत ७ अधिकाऱ्यांचे राजीनामे

NEWS डंका 3 weeks ago

युवा अधिकाऱ्यांच्या निर्णयाने प्रशासकीय वर्तुळात चर्चेला उधाण

त्तर प्रदेशातील २०१३ बॅचच्या चर्चित आयएएस अधिकारी दिव्या मित्तल यांनी १३ वर्षांच्या सेवेनंतर राजीनामा दिल्याने देशातील प्रशासकीय यंत्रणेत पुन्हा एकदा आयएएस-आयपीएस अधिकाऱ्यांच्या राजीनाम्याचा मुद्दा चर्चेत आला आहे.

विशेष म्हणजे, गेल्या १४ महिन्यांत ४० वर्षांखालील सहा अधिकाऱ्यांसह एकूण सात युवा आयपीएस अधिकाऱ्यांनी सेवा सोडली आहे. त्यामुळे देशातील सर्वात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या आयएएस-आयपीएस सेवांमधून अधिकारी बाहेर पडण्यामागची कारणे काय आहेत, यावर चर्चा सुरू झाली आहे.

उत्तर प्रदेश, बिहार आणि ओडिशामधील काही प्रकरणे सध्या विशेष चर्चेत आहेत. बिहारमधील नुरुल होदा आणि काम्या मिश्रा, मध्य प्रदेशातील अभिषेक तिवारी, आंध्र प्रदेशातील सिद्धार्थ कौशल, उत्तराखंडमधील लोकेश्वर सिंह, ओडिशातील रचिता जुयाल आणि जगमोहन मीणा या अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या कारणांमुळे सेवा सोडली. काही अधिकाऱ्यांनी राजकारणाचा मार्ग स्वीकारला, तर काहींनी कॉर्पोरेट क्षेत्र, सायबर सिक्युरिटी किंवा आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये करिअर करण्याला प्राधान्य दिले. ओडिशा कॅडरचे ३७ वर्षीय जगमोहन मीणा यांनीही वैयक्तिक कारणे आणि भविष्यातील करिअरच्या नियोजनाचा हवाला देत राजीनामा दिला.

मात्र, या घटनांवरून आयएएस-आयपीएस सेवांमध्ये मोठ्या प्रमाणावर राजीनाम्यांची लाट आली आहे, असे म्हणणे योग्य ठरणार नाही. या सेवांमधून बाहेर पडणाऱ्या अधिकाऱ्यांचे प्रमाण एकूण संख्येच्या तुलनेत अत्यल्प आहे. मात्र, बदलत्या काळानुसार अधिकाऱ्यांच्या करिअरच्या अपेक्षा बदलत असल्याचे या घटनांतून दिसून येते. राजकारण, खासगी क्षेत्रातील आकर्षक संधी, आंतरराष्ट्रीय संस्थांमधील काम आणि स्वतःच्या आवडीनुसार नवे क्षेत्र निवडण्याची इच्छा यामुळे काही अधिकारी प्रतिष्ठेची सरकारी सेवा सोडण्याचा निर्णय घेत आहेत. त्यामुळे हा केवळ राजीनाम्यांचा मुद्दा नसून, नव्या पिढीतील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदलत्या करिअरविषयक मानसिकतेचेही हे संकेत मानले जात आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka