Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अमेरिकेने बंदी घातलेल्या चीनी टँकरने होर्मुझ सामुद्रधुनी ओलांडली

अमेरिकेने बंदी घातलेल्या चीनी टँकरने होर्मुझ सामुद्रधुनी ओलांडली

NEWS डंका 1 month ago

नाकेबंदी असूनही 'रिच स्टारी' नावाच्या टँकरने पार केला मार्ग

अमेरिकेने लादलेल्या निर्बंधांनंतर आणि नौदलाच्या नाकेबंदी असूनही एका चीनी टँकरने होर्मुझ सामुद्रधुनीतून मार्ग काढल्याने जागतिक स्तरावर नव्या चिंतेला तोंड फुटले आहे.

शिपिंग डेटानुसार, 'रिच स्टारी' नावाचा टँकर मंगळवारी (१४ एप्रिल) या महत्त्वाच्या मार्गातून यशस्वीरित्या बाहेर पडला. हा टँकर अमेरिकेच्या निर्बंधांच्या कक्षेत असून त्याचे संचालन शांघाय झुआनरुन शिपिंग कंपनी लिमिटेडकडून केले जाते. इराणसोबत व्यापार केल्याच्या आरोपावरून या कंपनीवर कारवाई करण्यात आली होती. उपलब्ध माहितीनुसार, हा टँकर सुमारे २.५ लाख बॅरल मेथनॉल घेऊन जात होता, जे त्याने हमरिया बंदरातून लोड केले होते.

अमेरिकेची नाकेबंदी सुरू झाल्यानंतर अखाती प्रदेशातून बाहेर पडणारे हे पहिलेच जहाज आहे. यावरून होर्मुझ सामुद्रधुनीसारख्या रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाच्या मार्गावर नियंत्रणाबाबत परिस्थिती अजूनही गुंतागुंतीची असल्याचे दिसते. याआधीच चीनने अमेरिकेच्या कारवाईवर आक्षेप घेत इशारा दिला होता. चीनचे संरक्षणमंत्री डोंग जून यांनी स्पष्टपणे सांगितले की, होर्मुझ सामुद्रधुनीवर कोणत्याही प्रकारची नाकेबंदी मान्य नाही आणि इतर देशांनी चीन- इराण संबंधांमध्ये हस्तक्षेप करू नये. त्यांनी म्हटले, 'आमचे इराणसोबत व्यापार आणि ऊर्जा करार आहेत; इतर देशांनी आमच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नये.' त्यांनी हेही अधोरेखित केले की हा समुद्री मार्ग चीनसाठी खुला राहणे अत्यावश्यक आहे.

होर्मुझ सामुद्रधुनी हा जागतिक ऊर्जा पुरवठ्याचा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. चीन आपल्या तेलाच्या गरजांपैकी सुमारे ४० टक्के आणि एलएनजीच्या सुमारे ३० टक्के पुरवठा याच मार्गाने प्राप्त करतो. त्यामुळे या भागातील कोणताही तणाव थेट जागतिक ऊर्जा बाजारावर परिणाम करू शकतो. तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेची ही नाकेबंदी केवळ इराणवर दबाव आणण्यासाठी नसून, चीनी युआनमध्ये होणाऱ्या पर्यायी देयक प्रणालींनाही लक्ष्य करण्याचा प्रयत्न असू शकतो. हे पारंपरिक पेट्रोडॉलर व्यवस्थेसाठी आव्हान मानले जात आहे.

हंगेरीमधील रोमा समाजासाठी डॉ. आंबेडकरांचे विचार ठरले परिवर्तनाचे प्रतीक

बनावट व्हॉट्सअ‍प ग्रुप, भडकाऊ संदेश; नोएडा आंदोलनामागील धक्कादायक खुलासे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर केवळ व्यक्ती नाही, तर एक संकल्प!

नोएडात वेतनवाढ आंदोलन प्रकरणी ३०० जण अटकेत

वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनने या भागात स्थैर्य राखण्यासाठी युद्धविरामावर भर दिला आहे. विश्लेषकांच्या मते, हा संघर्ष वाढल्यास त्याचा परिणाम केवळ अखाती प्रदेशावरच नव्हे, तर जागतिक व्यापार आणि ऊर्जा पुरवठा साखळीवरही मोठ्या प्रमाणात होऊ शकतो.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka