Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अमेरिकेत अमेझॉनच्या कार्गो विमानाचा अपघात; ५ जणांचा मृत्यू

अमेरिकेत अमेझॉनच्या कार्गो विमानाचा अपघात; ५ जणांचा मृत्यू

NEWS डंका 1 month ago

धावपट्टी ओलांडून विमान वाहनांवर आदळले

अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये मियामी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अमेझॉनच्या मालवाहू विमानाचा भीषण अपघात झाला. लँडिंग करताना विमान धावपट्टी ओलांडून बाहेर गेले आणि विमानतळ परिसरातील अनेक वाहनांवर आदळले.

त्यानंतर विमानाला भीषण आग लागली. या दुर्घटनेत किमान पाच जणांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.

अमेझॉन प्राइम एअरचे फ्लाइट ७५९८ हे बोईंग ७६७-३०० मालवाहू विमान पोर्तो रिकोतील सॅन जुआन येथून मियामीला आले होते. स्थानिक वेळेनुसार दुपारी सुमारे २ वाजता लँडिंग करताना विमान धावपट्टीवरून पुढे गेले. त्यानंतर ते अनेक वाहनांवर आदळले आणि आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. दुर्घटनेनंतर आकाशात दाट काळ्या धुराचे लोट पसरल्याचे दृश्य समोर आले.

दुर्घटनेनंतर मियामी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्व धावपट्ट्या आणि टॅक्सीवे तात्पुरते बंद करण्यात आले. त्यामुळे विमानतळावर 'ग्राउंड स्टॉप' लागू करण्यात आला असून अनेक उड्डाणांवर परिणाम झाला. नंतर काही धावपट्ट्यांवरील सेवा पुन्हा सुरू करण्यात आल्या, मात्र प्रवाशांना मोठ्या विलंबाचा सामना करावा लागला. अपघातानंतर मियामी-डेड फायर रेस्क्यूच्या ६० हून अधिक युनिट्स घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाने विशेष फोम आणि विमानतळावरील अग्निशमन उपकरणांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. विमानाच्या कॉकपिटमध्ये पायलट आणि सहवैमानिक अडकल्याची माहितीही समोर आली होती. तसेच, विमानाच्या धडकेमुळे काही वाहनांमध्ये अडकलेल्या लोकांचीही सुटका करण्यात आली.

नेपाळमधील जलप्रलयानंतर चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हला दणका

दिल्लीत ढिगाऱ्यात अडकलेल्या विद्यार्थ्याचा आपत्कालीन मदतीसाठीचा व्हिडिओ व्हायरल

इशान किशनच्या शतकामुळे पूर्व विभाग मजबूत स्थितीत

भारताच्या ज्युनियर महिलांचा आशिया कप हॉकीत सलग दुसरा विजय

दरम्यान, हे विमान अमेझॉन एअरच्या ताफ्यातील असले तरी ते २१ एअर या कंपनीकडून ऑपरेट केले जात होते. अमेझॉनने दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त करत स्थानिक प्रशासनाला तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून अमेरिकेची फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (FAA) आणि नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड (NTSB) यांनी दुर्घटनेचा तपास सुरू केला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka