Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अंकित बालियान हत्या प्रकरणातील दोन शुटर्स एन्काऊंटरमध्ये ठार

अंकित बालियान हत्या प्रकरणातील दोन शुटर्स एन्काऊंटरमध्ये ठार

NEWS डंका 2 weeks ago

उत्तर प्रदेश पोलिसांची कारवाई

रियाणवी गायक आणि यूट्यूबर अंकित बालियान याच्या हत्या प्रकरणात उत्तर प्रदेश पोलिसांनी कारवाई केली आहे. हत्येत सहभागी असल्याचा आरोप असलेल्या चार शूटरपैकी दोन जणांना पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये ठार केलं आहे.

सोमवारी पहाटे शामलीमध्ये ही कारवाई करण्यात आली.

माहितीनुसार, सुमित आणि मोहित अशी ठार झालेल्या आरोपींची नावं आहेत. दोघेही हरियाणातील सोनीपतचे रहिवासी असून, त्यांच्या अटकेसाठी प्रत्येकी ५० हजार रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. दोघेही अंकित याच्या हत्येत सहभागी असलेल्या चार शूटरपैकी असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

अंकित याच्या हत्येनंतर पोलिसांनी शामली जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पहाटे ६ वाजेपर्यंत नाकाबंदी आणि वाहनांची तपासणी सुरू केली होती. पहाटे सुमारे ४ वाजता मोटारसायकलवरून जाणाऱ्या दोन संशयितांना पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी पोलिसांवर गोळीबार करत पळून जाण्याचा प्रयत्न केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. यानंतर आरोपींनी आणखी एका पोलिस पथकावर गोळीबार केला. त्यात पोलिसांच्या वाहनाची काच फुटली. पोलिसांनी पाठलाग सुरू केल्यानंतर आरोपी एका अरुंद रस्त्यात अडकले. यावेळी त्यांनी पुन्हा पोलिसांवर गोळीबार केल्याचं सांगण्यात येत आहे. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन्ही आरोपी गंभीर जखमी झाले.

या चकमकीत दोन पोलीस कर्मचारीही गंभीर जखमी झाले. जखमी आरोपींना शामलीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं; मात्र उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. घटनास्थळावरून शस्त्रं आणि इतर संशयास्पद साहित्य जप्त करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

फोनवर बोलताना भरधाव कारने आठ वर्षीय मुलाला चिरडलं

बटवारा १९४७ वर तारासिंगचा हॅण्डपम्प कोसळला…

मैसूर एक्सप्रेस' जवागल श्रीनाथ!

भारत - उझबेकिस्तान संबंधांना युरेनियमचे नवे इंधन

हरियाणवी गायक आणि यूट्यूबर अंकित बालियान याची २६ ऑगस्ट रोजी शामलीमध्ये हत्या करण्यात आली होती. जिममधून बाहेर पडताच दोन मोटारसायकलवरून आलेल्या चार हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.या हत्येनंतर सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे गोगी गँगने हत्येची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा करण्यात आला होता. अंकित यांनी गँगशी संबंधित एका घटनेवर गाणं तयार केल्याचा आरोप या पोस्टमध्ये करण्यात आला होता. मात्र, या दाव्याची सत्यता आणि हत्येमागील नेमकं कारण तपासण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka