Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अरविंद केजरीवालांच्या भ्रष्टाचार, गुंडागर्दी आणि खोटेपणामुळे पक्ष सोडला

अरविंद केजरीवालांच्या भ्रष्टाचार, गुंडागर्दी आणि खोटेपणामुळे पक्ष सोडला

NEWS डंका 1 month ago

भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर स्वाती मालीवाल यांनी मांडली भूमिका

आम आदमी पार्टी पक्षात गेल्या काही तासांत मोठ्या घडामोडी घडल्या. तब्बल सात खासदारांनी पक्षाची साथ सोडली. राज्यसभेतील सात खासदारांमध्ये स्वाती मालीवाल यांचाही समावेश आहे.

स्वाती मालीवाल यांनी आता पक्ष सोडण्याचे कारण स्पष्ट केले आहे. अरविंद केजरीवाल यांच्या भ्रष्टाचार, गुंडागर्दी आणि खोटेपणामुळे त्यांना 'आप' सोडावी लागली, असा दावा त्यांनी केला आहे.

स्वाती मालीवाल म्हणाल्या की, मी आम आदमी पार्टी सोडली आहे आणि भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. मी २००६ पासून अरविंद केजरीवाल यांच्यासोबत काम करत होते. पक्षाच्या प्रत्येक आंदोलनात साथ दिली, पण अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या सहकाऱ्यांकडून मला त्यांच्या घरातच निर्दयपणे मारहाण करून घेतली. जेव्हा एफआयआर नोंदवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा धमकावण्यात आले. मागील दोन वर्षांत माझ्यावर एफआयआर मागे घेण्यासाठी दबाव टाकण्यात आला. संसदेत मला बोलण्यासाठी एक मिनिटही दिले गेले नाही.

स्वाती मालीवाल यांनी अरविंद केजरीवाल यांना महिलाविरोधी असल्याचा आरोप केला. त्या म्हणाल्या की, ते देशात खोटेपणा, भ्रष्टाचार आणि गुंडागर्दीसाठी ओळखले जातात. दिल्ली विधानसभा निवडणूक हरल्यानंतर ते पंजाब सरकार रिमोट कंट्रोलने चालवत आहेत आणि पंजाबला त्यांनी स्वतःचा एटीएम बनवला आहे. वाळू खनन आणि अमली पदार्थांचा वापर पंजाबमध्ये वाढला आहे. हे सर्व त्यांच्या छत्रछायेखाली चालत आहे. लोकांच्या मेहनतीच्या पैशांचा वापर त्यांनी स्वतःच्या ऐशोआरामासाठी केला आहे.

जम्मू- काश्मीरमधील झुल्फिकारने 'कृष्ण' बनून हिंदू महिलेला ओढले प्रेमाच्या जाळ्यात

गुन्हेगारी पार्श्वभूमी लपवून नागरिकत्व घेणाऱ्या पाकिस्तानी नागरिकाविरुद्ध तक्रार

रेशन वितरण घोटाळाप्रकरणी पश्चिम बंगालमध्ये नऊ ठिकाणी छापे

मणिपूरमध्ये नागा- कुकी समाजांमध्ये संघर्ष; तिघांचा मृत्यू

पुढे विभव कुमार यांचा उल्लेख करत त्या म्हणाल्या की, ज्याने मला मारहाण केली तो सर्वांना माहीत आहे. त्यालाच अरविंद केजरीवाल यांनी पंजाबमध्ये झेड प्लस सुरक्षा दिली आणि भगवंत मान यांचा मुख्य सल्लागार नेमले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत त्या म्हणाल्या की, मोदी हे केवळ देशातच नव्हे तर जगातही अत्यंत लोकप्रिय नेते आहेत. ऑपरेशन सिंदूर असो, नक्षलवादाविरुद्धची लढाई असो किंवा महिला आरक्षण विधेयक—मी त्यांच्या कामाने प्रभावित आहे. मी कोणत्याही दबावाखाली भाजपात प्रवेश केलेला नाही, तर त्यांच्या नेतृत्वावर माझा विश्वास आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka