शस्त्रे आणि दारुगोळा केला जमा
प्रतिबंधित युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम-इंडिपेंडेंट अर्थात उल्फा-आयच्या चार कॅडरनी अरुणाचल प्रदेशातील लोंगडिंग जिल्ह्यात आसाम रायफल्ससमोर आत्मसमर्पण केले.
आत्मसमर्पण करताना त्यांनी चार शस्त्रे, दारुगोळा आणि युद्धाशी संबंधित साहित्य सुरक्षा दलाकडे जमा केले.
संरक्षण विभागाच्या माहितीनुसार, लोंगडिंग जिल्ह्यातील चुपखाओ ट्रॅक परिसरात मिळालेल्या गुप्त माहितीनंतर सुरक्षा दलाने नियोजनबद्ध कारवाई केली. परिसरावर सातत्याने नजर ठेवणे, गुप्त माहिती गोळा करणे आणि अचूक नियोजन केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. सुरक्षा दलांच्या प्रयत्नांनंतर संबंधित कॅडरनी हिंसाचाराचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात परतण्याचा निर्णय घेतला. चार कॅडरचे आत्मसमर्पण आणि त्यांच्याकडून शस्त्रे व दारुगोळा जमा करण्यात आल्याने या भागातील उल्फा-आयच्या कारवायांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
राहुल गांधींच्या 'छात्रों की गूंज'पेक्षा जंतर-मंतरवरील आंदोलनाचा प्रभाव
चीप ते शिपपर्यंत सगळे तुम्हालाच करायचे आहे!
पेट्रोल दरवाढीविरोधात पाकिस्तानात संताप; प्रमुख शहरांमध्ये निदर्शने, रॅली
होर्मुज सामुद्रधुनीजवळ व्यापारी जहाजावर हल्ला
सुरक्षा दलांकडून कारवाईसोबतच स्थानिक नागरिकांशी संपर्क आणि संवाद वाढवण्यावरही भर दिला जात आहे. दिशाभूल झालेल्या तरुणांनी हिंसेचा मार्ग सोडून शांतता आणि विकासाच्या प्रक्रियेत सहभागी व्हावे, हा या प्रयत्नांचा उद्देश आहे. ईशान्य भारतात शांतता, स्थैर्य आणि सुरक्षा कायम ठेवण्याच्या भूमिकेवर भारतीय सशस्त्र दल ठाम असल्याचे अधिकृत निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

